राज ठाकरे भाजप पुरस्कृत, राज्यात त्यांचंच सरकार… संजय राऊत यांचं नेमकं विधान काय?

शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे पुन्हा निवडून येणार नसल्याचा दावाही त्यांनी केला. हे सर्व चोर लफंगे त्या डबक्यात कातडी वाचवण्यासाठी गेले आहेत.

राज ठाकरे भाजप पुरस्कृत, राज्यात त्यांचंच सरकार... संजय राऊत यांचं नेमकं विधान काय?
राज ठाकरे भाजप पुरस्कृत, राज्यात त्यांचंच सरकार... संजय राऊत यांचं नेमकं विधान काय? Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 07, 2023 | 2:12 PM

नाशिक: राज ठाकरेंना शिवसेना भवनासमोर सभा घ्यायची तर घेऊ द्या. शिवसेना भवनाविषयी सर्वांनाच प्रेम आहे. प्रत्येकाचा आत्मा तिकडे अडकला आहे. सभा घ्यायला कुणाची बंदी आहे का? आम्ही रोज शिवतिर्थावर सभा घेतो त्यांच्या घरासमोर. घेऊ द्या त्यांना सभा. जर महापालिकेने त्यांना परवानगी दिली आणि देणारच आहेत. कारण सरकार त्यांचंच आहे. ते सुद्धा भाजप पुरस्कृतच आहेत सगळे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. ते मीडियाशी संवाद साधत होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2023मधील पहिली सभा शिवसेना भवनासमोर घेणार आहेत. त्याबाबत विचारले असता त्यांनी राज ठाकरे हे भाजप पुरस्कृत असल्याची टीका केली. तसेच सभेची परवानगी आम्हाला मिळत नाही. आम्हाला संघर्ष करावा लागतो. कारण आमची भीती आहे. सत्ताधाऱ्यांना ज्यांची भीती नसते त्यांना कुठेही लघुशंका परवानगी मिळते, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे पुन्हा निवडून येणार नसल्याचा दावाही त्यांनी केला. हे सर्व चोर लफंगे त्या डबक्यात कातडी वाचवण्यासाठी गेले आहेत. हे सर्व तुरुंगात जाणार आहेत. त्यांची प्रकरणे भविष्यात उघडली जातील. हेमंत गोडसे यांचं एक प्रकरण नाहीये. अनेक प्रकरणं आहेत, असा दावा राऊत यांनी केला.

तो (हेमंत गोडसे) परत खासदार होणारच नाही. त्याला शिंदे गट उमेदवारी देणार नाही. भाजप उमेदवारी देणार नाही. त्याचं डिपॉझिट जप्त होणार आहे. शिवसेनेतून गेलेले अनेक लोकं विधानसभा आणि लोकसभेत दिसणार नाहीत. महापालिकेतही दिसणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

नेहमीप्रमाणे नाशिकला आलोय. महाराष्ट्रात फिरत आहोत. नागपूरलाही गेलो होतो. अधिवेशन काळात नागपूरला गेलो होतो. सरकारचा गोंधळ पाहता आला. सरकार अस्तित्वातच नाही. मला आश्चर्य वाटतंय रोज मंत्र्यांचं भ्रष्टाचाराचं प्रकरण समोर येत असताना सरकार गेंड्याच्या कातडी प्रमाणे बसून होतं.

मुख्यमंत्र्यांच्या भूखंडाची दोन प्रकरणं आली. उदय सामंत यांची बोगस डिग्री, सत्तार यांचा भूखंड प्रकरण आलं. सरकार मात्र पाण्यात बसलेल्या म्हशी सारखं होतं, अशी टीका त्यांनी केली.

विरोधी पक्ष गुन्हेगार आहे अशा प्रकारे सरकार विरोधकांकडे पाहत होतं. पूर्वी मुख्यमंत्र्यांवर कोर्टाने ताशेरे ओढले तरी राजीनामा देत होते. अंतुले यांनीही राजीनामा दिला. ते नंतर निर्दोष सुटले. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनीही राजीनामा दिला.

पण अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं आली तरी सरकार ठोंब्याप्रमाणे बसून होते. सरकारमध्ये दोन गट आहेत. तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही बघा सुरू आहे, असा दावाही त्यांनी केला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.