वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल, शरद पवार यांनी सुनावलं
तुमच्या हातात देशाची सत्ता आहे. या सत्तेचा वापर करून चौकशी करा. दोषींना शिक्षा करा. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असंही शरद पवार म्हणाले.
नाशिक : राजकारण सामान्य माणसासाठी काम करायचं असतं. स्वातंत्र्याचा इतिहास मोठा आहे. स्वातंत्र्यासाठी नाशिकच्या नेत्यांनी ऐतिहासिक काम केलं. स्वातंत्र्य चळवळीमध्ये हा जिल्हा सक्रिय राहिला. देश परकियांच्या जोखडातून मुक्त झाला पाहिजे. यासाठी नाशिक जिल्ह्याने काम केलं. असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी येवला येथील जाहीर सभेत व्यक्त केलं.
आम्ही तुमच्यासोबत आहोत
शरद पवार म्हणाले, चुकीच्या काही गोष्टी झाल्या असतील. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेसवरही आरोप केले. ते आरोप भ्रष्टाचाराचे होते. तुमच्या हातात देशाची सत्ता आहे. या सत्तेचा वापर करून चौकशी करा. दोषींना शिक्षा करा. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असंही शरद पवार म्हणाले.
तुमची माफी मागणं माझं कर्तव्य
येवला येथील सभेत बोलताना शरद पवार म्हणाले, आज मी या ठिकाणी माफी मागायला आलो. माझा अंदाज चुकत नाही. पण इथं चुकला. त्यामुळं तुम्हाला यातना झाल्या. माझं कर्तव्य तुमची माफी मागणं आहे.
वयाच्या भानगडीत पडू नका
शरद पवार म्हणाले, काही लोकं म्हणतात, तुमचं वय झालंय. वय झालं हे खरं आहे. पण, निवृत्त व्हा. असं म्हणू नका. वयाच्या भानगडीत पडू नका. गडी काय हे पाहिलचं नाही. काय टीका करायची ती करा. पण वय आणि व्यक्तिगत टीका करू नका, असंही शरद पवार यांनी सुनावलं.
काय करायचं ते लोकं ठरवतील
छगन भुजबळ यांना संधी दिली. पण, ते सोडून गेले. त्यातून माणसाचं कॅरेक्टर कळतं. माझं असेसमेंट चुकलं यात मी दुसऱ्याला दोष देत नाही. जे आमच्यापासून बाजूला गेले त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही. कारण काय करायचं ते लोकं ठरवतील.