शिंदे गटाला कचरा गोळा करायची सवय, संजय राऊत यांची खोचक टीका, राऊत नेमकं काय म्हणाले?

तुम्ही गुंड आहात तर मी महागुंड आहे. मी पळपुटा नाही. मी गुढगे टेकले नाहीत.

शिंदे गटाला कचरा गोळा करायची सवय, संजय राऊत यांची खोचक टीका, राऊत नेमकं काय म्हणाले?
संजय राऊत
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 7:29 PM

नाशिक : संजय राऊत नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या तयारीसाठी आले. त्यावेळी ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, कोणताही धक्का बसलेला नाही. मी असे वृत्तपत्रात वाचले काही लोक गेले म्हणून. जे गेले त्यांचे नाव पण मला माहीत नव्हते. शिंदे गटाला कचरा गोळा करायची सवय लागली. त्यांच्यासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण करतात. शिवसेना काय आहे हे निवडणुका होऊ द्या मग कळेल. योगी मुंबईत येऊन 5 लाख कोटींची गुंतवणूक मुंबईतून नेतात. आमचे मुख्यमंत्री तिकडे दावोसला चालले म्हणे बर्फ उडवायला, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली. शिवाजी महाराजांचा अपमान झाले की चुप राहतात. भाजपच्या लोकांना शिवाजी महाराजांशी काही प्रेम नाही. मागे शिवाजी महाराजांची तुलना मोदी यांच्याशी केली होती, याची आठवण संजय राऊत यांनी करून दिली.

सगळे चोर लंफगे कचरा शिंदे गटात गेले आहेत. हे जे खासदार आहेत ते परत निवडून येणार नाहीत. समृध्दीचा पैसा असो किंवा वसुलीचे पैसे याने निवडणुका जिकंता येत नाहीत. असा हल्लाबोल संजय राऊत यांनी शिंदे गटावर केला.

आज सकाळी नारायण राणे यांना उत्तर दिले. तेव्हापासून माझी ओळख सांगणे बंद केली. चांगले आहे. त्यांच्यासाठी हे महाशय पवार साहेब असो मागे मोदी आणि अन्य यांच्यावर काहीही बोलतात. परत जर त्यांना असे केले तर मी खपवून घेणार नाही. मी येवढे दिवस त्यांचा मान ठेवायचो आता तसे होणार नाही, असंही संजय राऊत यांनी म्हंटलं.

माझ्याशी ओळख काढण्याचा जर परत राणे यांनी प्रयत्न केला तर लक्षात ठेवा माझे नाव संजय राऊत आहे. तुम्ही गुंड आहात तर मी महागुंड आहे. मी पळपुटा नाही. मी गुढगे टेकले नाहीत. मी पक्षासाठी जीवाचे रान केले. संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर हल्ला बोल केला.

नाशिकला उध्दव ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यांच्या सभेच्या तयारीसाठी मी आलो आहे. नागपुरात कस्तुरी पार्कलाही उध्दव ठाकरे यांची सभा होणार आहे, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....