Nashik | ‘अभिनव भारत’च्या श्रेयासाठी खासदार गोडसेंची केविलवाणी धडपड; आमदार फरांदेंकडून विधानसभेत भांडाफोड

आमदार देवयानी फरांदे विधानसभेत म्हणाल्या की, खासदार हेमंत गोडसे यांनी आतापर्यंत कधी अभिनव भारत मंदिरला साधी भेटही दिली नाही. निधी मिळावा म्हणून कोणताही प्रयत्न आणि प्रक्रिया केली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातून नव्याने प्रस्ताव देखील दिला नाही. मात्र, कोणतेही काम न करता आपण निधी मिळवल्याच्या बातम्या पेरल्या. खासदार हेमंत गोडसे यांचे हे वृत्त खोडसाळपणाचे व श्रेय लाटण्याचा दुर्दैवी प्रयत्न आहे.

Nashik | 'अभिनव भारत'च्या श्रेयासाठी खासदार गोडसेंची केविलवाणी धडपड; आमदार फरांदेंकडून विधानसभेत भांडाफोड
देवयानी फरांदे आणि हेमंत गोडसे.
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 12:18 PM

नाशिकः गेल्या चार वर्षांपासून नाशिकमधील (Nashik) सुप्रसिद्ध अशा अभिनव भारत मंदिराच्या नूतनीनकरणासाठी भाजप (BJP) आमदार देवयानी फरांदे यांनी पाठपुरावा करून निधीसाठी प्रयत्न केले. मात्र, निधी मंजूर झाल्यानंतर या कामाचे श्रेय लाटण्यासाठी शिवसेना (Shivsena) खासदार हेमंत गोडसे पुढे आले. त्यांनी नाशिकमध्ये या कामाचे श्रेय घेण्यासाठी जो आटापिटा चालवला आहे, त्याचा भांडाफोड आमदार देवयानी फरांदे यांनी चक्क विधानसभेत केला. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमोर कागदपत्रे वाचून दाखवत या केविलवाणी प्रयत्नांबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. या साऱ्या प्रकरणाचे मूळ कारण म्हणजे दोनच दिवसांपू्र्वी अभिनव भारत मंदिराला पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी निधी दिला. त्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी प्रयत्न केला, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, गोडसे यांनी अभिनव भारत मंदिराला कधीही साधी भेट सुद्धा दिली नाही. आता निधी मिळणार म्हटल्यानंतर श्रेयवाद आणि प्रसिद्धीसाठी आपल्या नावाचे घोडे दामटत आहेत, हे पाहून आमदार देवयानी फरांदे विधानसभेत आक्रमक झाल्या. त्यांनी थेट आदित्य ठाकरेंसमोरच हे सारे प्रकरण मांडले. अन् इतरही सारे अवाक झाले.

फडणवीस सरकारकडून 1 कोटी

नाशिक येथील अभिनव भारत मंदिराचे नूतनीकरण करावे याची मागणी 1968 झाली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केली होती. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा हा विषय आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला. या प्रकल्पासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 1 कोटी रुपयांचा निधी दिला गेला. त्याचा कार्यारंभ आदेश देऊन काम प्रगतिपथावर आहे.

फरांदेंचे अतिरिक्त 5 कोटीसाठी प्रयत्न

अभिनव भारत मंदिरला अतिरिक्त 5 कोटी रुपयांचा निधी मिळावा म्हणून आमदार देवयानी फरांदे यांनी मागणी केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत याबाबतचा प्रस्ताव दिनांक 18 मे2018 रोजी आमदार देवयानी फरांदे यांच्या मागणीनुसार देण्यात आला होता. त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने सदर कामाला 5 कोटी रुपयांचा निधी मिळावेत यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अधिवेशनात देखील फरांदे यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन निधीची मागणी केली. त्यानंतर निधी मिळाल्याच्या बातम्या आल्या.

पण श्रेयासाठी गोडसे पुढे

आमदार देवयानी फरांदे विधानसभेत म्हणाल्या की, खासदार हेमंत गोडसे यांनी आतापर्यंत कधी अभिनव भारत मंदिरला साधी भेटही दिली नाही. निधी मिळावा म्हणून कोणताही प्रयत्न आणि प्रक्रिया केली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातून नव्याने प्रस्ताव देखील दिला नाही. मात्र, कोणतेही काम न करता अभिनव भारतासाठी आपण निधी मिळवल्याच्या बातम्या पेरल्या. खासदार हेमंत गोडसे यांचे हे वृत्त खोडसाळपणाचे व श्रेय लाटण्याचा दुर्दैवी प्रयत्न आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न न करता जनतेची कामे करावी, असा सल्ला आमदार देवयानी फरांदे यांनी दिला. तेव्हा हा निधी आमदार फरांदे यांनाच दिला जाणार असल्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

इतर बातम्याः

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.