जितेंद्र भावेंच्या आंदोलनाची राज्यभर चर्चा, रुग्णालयातील ऑडिटर काय करतात? शिवसेनेचा आक्रमक सवाल
जितेंद्र भावेंच्या आंदोलनानंतर शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. महापालिकेने नेमलेले ऑडिटर काय करतात, असा सवाल सेनेनं केला आहे. Shivsena Nashik Municipal Corporation
नाशिक: मधील खासगी रुग्णालयांच्या मुजोरी विरोधात आम आदमी पार्टीच्या जितेंद्र भावे यांनी आंदोलन केल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून त्यांना जोरदार पाठिंबा मिळाला. शिवसेनेने देखील आता या लढ्यात उडी घेतली आहे. महापालिकेने नियुक्त केलेल्या ऑडिटर ची चौकशी करून खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप लावावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.(Shivsena demand Nashik Municipal Corporation should take action on auditor who appointed at private hospitals)
ऑडिटर काय करत आहेत? सेनेचा सवाल
नाशिकच्या खासगी हॉस्पिटलच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांनी अर्धनग्न होत आंदोलन केलं. याप्रकरणी पोलिसांनी भावेंना ताब्यात घेतल्यानंतर, सर्वसामान्य नाशिककर जनतेच्या दबावामुळे पोलिसांना भावेंवर कोणतीही कारवाई न करता त्यांना सोडून द्यावा लागलं. मात्र, सर्वसामान्यांचा मिळालेला पाठिंबा लक्षात घेत, शिवसेनेने देखील आता या प्रकरणात उडी घेतली आहे. महापालिकेने नियुक्त केलेले खासगी रुग्णालयांचं ऑडिट करणारे ऑडिटर काय करत आहेत? असा संतप्त सवाल शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी उपस्थित केला आहे.
महापौरांचा रुग्णांची लूट थांबण्याचा इशारा
दरम्यान दुसरीकडे नाशिकच्या महापौरांनी यापूर्वीच खासगी रुग्णालयांकडून सुरू असलेली रुग्णांची लूट तात्काळ थांबवावी.अन्यथा हॉस्पिटलची मान्यता रद्द करण्यात येईल असा इशारा नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी रुग्णालयांना दिला आहे.
खासगी रुग्णालयांनी ऑडिटरला गुंडाळले?
कोरोना काळात खाजगी हॉस्पिटल कडून रुग्णांची लूट होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येऊ लागल्याने महापालिकेच्यावतीने ऑडिटरची नियुक्ती करण्यात आली. मात्र, या खासगी रुग्णालयांनी ऑडिटरला देखील गुंडाळल्याची संतप्त भावना व्यक्त होतं आहे. दरम्यान, शिवसेनेनं या संपूर्ण प्रकरणात उडी घेतल्यानंतर, खासगी रुग्णालयांची मुजोरी थांबते का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
जितेंद्र भावे यांच्यावर सरकारपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा
सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांच्यावर नाशिकधील सरकारपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. व्हिजन हॉस्पिटलच्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंदवण्यात आला. दुसरीकडे मुंबई नाका पोलीस ठाण्यात देखील साथरोग कायद्याचं उल्लंघन आणि गर्दी जमलवल्या प्रकरणी जितेंद्र भावे आणि समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्र भावेंच्या अडचणी वाढल्या, नाशिकमध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?https://t.co/GZ9NV3RHQA#Nashik | #JitendraBhave | #NashikPolice | #HospitalBill
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 27, 2021
संबंधित बातम्या:
VIDEO: नाशिकच्या खासगी रुग्णालयाकडून आकारलं जातंय अवाजवी बिल, सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप
जितेंद्र भावेंच्या अडचणी वाढल्या, नाशिकमध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?
(Shivsena demand Nashik Municipal Corporation should take action on auditor who appointed at private hospitals)