मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाला सेना नेत्यांचीच केराची टोपली, ‘कारवाई होणार का?’, नाशिककरांचा सवाल
कोरोनाला रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन विविध उपाययोजना करतंय. आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस झटतीय. लोकांना नियम पाळण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने करतायत. पण शिवसेनेचेच लोक शासनाने घालून दिलेले नियम पायदळी तुडवतायत, प्रसंगी त्यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवतायत.
नाशिक : कोरोनाला रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन विविध उपाययोजना करतंय. आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस झटतीय. लोकांना नियम पाळण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने करतायत. पण शिवसेनेचेच लोक शासनाने घालून दिलेले नियम पायदळी तुडवतायत, प्रसंगी त्यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवतायत.
खासदार हेमंत गोंडसेंच्या कार्यक्रमाला गर्दी
नाशिकमध्ये खासदार हेमंत गोडसेंच्या हस्ते झालेल्या उड्डाणपुलाच्या उदघाटन कार्यक्रमाला स्थानिक नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली. यावेळी गोडसेंसह अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाला शिवसेना नेत्यांकडूनच केराची टोपली दाखवली जातीय, अशी परिस्थिती आहे
काल वरुण सरदेसाई तर आज हेमंत गोडसेंच्या कार्यक्रमात कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवले गेले…बरं इतकंच काय तर खासदार साहेबांनी या ठिकाणी आपलं फोटो सेशनही केलं, म्हणजे आता तुम्हीच बघा, गरजेचं काय आहे….!
शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता के के वाघ कॉलेज ते जत्रा हॉटेल दरम्यान 2.6 किमी उड्डाणपूल तयार करण्यात आला.. जवळपास 457 कोटी रुपयांचा हा उड्डाणपूल बनवण्यात आलाय…आज हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. याच कार्यक्रमा दरम्यान कोरोनाचे नियम पायदळी तुडवले गेले…
युवा सेना संवाद मेळाव्याला तर कार्यकर्त्यांनी हद्दच केली!
काल वरुण सरदेसाई यांच्या युवा सेना संवाद मेळाव्या दरम्यानदेखील सर्व नियमांची पायमल्ली केली गेली.. याबाबत शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना विचारले असता, उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांची गर्दी झाली, असं नेहमीचं उत्तर त्यांनी दिलं.. त्यामुळे सामान्य नागरिकांप्रमाणे या नेतेमंडळीवर आता कारवाई होणार का? हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
(Shivsena MP hemant Godse And Yuvasena leader Varun Sardesai Behave Against Cm Uddhav Thackeray Order)
हे ही वाचा :
प्रकाश आंबेडकरांच्या ‘अकोला पॅटर्न’चे शिलेदार मखराम पवार यांचे निधन
भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार?, महाराष्ट्रातील भाजप नेते दिल्लीत; चंद्रकांत पाटील म्हणाले…