नाशिकः नाशिक पदवीधर मतदार संघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यामुळे ही निवडणूक प्रचंड चर्चेची ठरली आहे. वेगवेगळ्या घटना घडामोडींमुळे साऱ्या राज्याचे लक्ष आता या नाशिककडे लागले आहे.शुभांगी पाटील नॉट रिचेबल असतानाच शुभांगी पाटील यांच्या अर्जावर सुचक म्हणून सही करणाऱ्या जसपालसिंह सिसोदिया यांनी शुभांगी पाटील अर्ज माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे शुभांगी पाटील नॉट रिचेबल असतानाच अर्ज माघार घेणार नाही असे स्पष्ट सांगितल्याने ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय निर्णय घेणार हे आता काही वेळातच स्पष्ट होणार आहे.
शुभांगी पाटील यांची उमेदवारी कायम राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या त्या अधिकृत उमेदवार असल्याचेही त्यांनी सांगितले आहेत,
तर सायंकाळपर्यंत काँग्रेसचा पाठिंबा जाहीर करणार असल्याचे सिसोदिया यांनी स्पष्ट केले. शुभांगी पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे सत्यजित तांबे यांना आव्हान निर्माण झाले आहे.
सत्यजित तांबे यांच्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड मोठा गदारोळ माजला आहे, त्यातच सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसने कारवाईचा बडगा उचलल्याने सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.
पदवीधर मतदार संघासाठी आता शुभांगी पाटील यांचे आव्हान उभा राहिले असल्याने आणि आता सूचक जसपालसिंह सिसोदिया यांनी स्पष्टपणे आपल्याला राजकीय पक्षांचा पाठिंबा असून त्या माघार घेणार नाहीत असं स्पष्टपणे सांगितले होते.
त्यामुळे सत्यजित तांबे यांना ही निवडणूक आता मोठे आव्हान उभा असल्याचे दिसून येत आहे. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज माघार घेण्याचा अंतिम दिवस होता.
त्यामुळे शुभांगी पाटील आज अर्ज माघार घेणार का असा सवाल उपस्थित केला जात असतानाच जसपालसिंह सिसोदिया शुभांगी पाटील कोणत्याही परिस्थितीत अर्ज माघार घेणार नाहीत.
मात्र त्याचवेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचाही पाठिंबा मिळणार असून सायंकाळपर्यंत आपल्याला काँग्रेसचाही पाठिंबा जाहीर होईल असंही त्यांनी स्पष्ट सांगितले.
काँग्रेसचा पाठिंबा शुभांगी पाटील यांना मिळणार असल्याने सत्यजित तांबे यांच्याबद्दल आता साशंकता व्यक्त केली जात आहे.