शुभांगी पाटील या ठाकरे गटाच्या की, महाविकास आघाडीच्या उमेदवार?, शुभांगी पाटील यांनी सांगितलं
माझ्यावर दबाव होता की, नाही, हे वेळ आल्यावर कळेल. त्याबाबत मी न बोललेलं बरं. महाविकास आघाडीनं मला पाठिंबा द्यायचा की, नाही, हे ते ठरवतील.
चैतन्य गायकवाड, प्रतिनिधी, नाशिक : शिवसेनेच्या (Shiv Sena) ठाकरे गटाचा मला पाठिंबा आहे. माझी उमेदवारी कायम आहे, असं वक्तव्य शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी केलं. याशिवाय महाविकास आघाडीची उमेदवारी मिळविण्यासाठी माझा पाठिंबा मिळविण्यासाठी माझा प्रयत्न असेल, असंही त्या म्हणाल्या. माझा उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास आहे. त्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले. शुभांगी पाटील नाशिक आयुक्त कार्यालयात दाखल झाल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, मी उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले आहेत. शिवसेनेचा पाठिंबा मला मिळाला आहे. मी नाना पटोले, अजित पवार, जयंत पाटील यांच्याशी देखील माझे बोलणे झाले आहे. उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलतील आणि काय ते ठरवतील, असा विश्वासही शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला.
मी लढायचे ठरवले आहे. ही उमेदवारी माझी नसून, सामान्य जनतेची आहे. मतदारांनी ठरवले आहे की, बहिणीला 30 तारखेला माहेरची साडी देऊन 2 तारखेला चित्र वेगळे असेल. सामान्य घरातील मुलगी आमदार असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माझी भूमिका बदलण्याची वेळ संपली
मोबाईल नॉट रिचेबल होता. त्यावरून मला धमकी आली की नाही, हे तुम्ही समजू शकता. पण, मी माघार घेतली नाही. जनता माझं ऐकते आहे. धनशक्ती की, जनशक्ती ही जनता ठरवेल. महाविकास आघाडीनं माझ्याबाबत विचार केला असेल. माझी भूमिका बदलण्याची वेळ संपलेली आहे.
दबाव होता की नाही हे वेळ ठरवेल
माझ्यावर दबाव होता की, नाही, हे वेळ आल्यावर कळेल. त्याबाबत मी न बोललेलं बरं. महाविकास आघाडीनं मला पाठिंबा द्यायचा की, नाही, हे ते ठरवतील. मी माझ्या उमेदवारीवर ठाम असल्याचं शुभांगी पाटील यांनी सांगितलं.
भाजपनं मला संधी दिली नाही
काहीतरी झाल्याशिवाय व्यक्ती नॉट रिचेबल नसतो, हे तुम्हालाही कळते. मी नॉट रिचेबल का होती, हे वेळ आल्यावर कळेल. मी महाराष्ट्रातली एकमेव महिला उमेदवार आहे. त्यावर योग्य ते निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. भाजपने मला संधी दिली नाही. पण, महाविकास आघाडी मदत करेल, असा विश्वास असल्याचंही त्या म्हणाल्या.
पक्षात या नंतर विचार करू असं सांगितलं होतं
भाजपने उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. त्यामुळं मी भाजपत गेली. तीन महिन्यांपूर्वी अन्यथा कुणी गेलं नसतं. भाजपनं तुम्ही पक्षात या नंतर विचार करू असं सांगितलं होतं, असा गौप्यस्फोटही शुभांगी पाटील यांनी दिला.
शिक्षक संघटनांशी माझं बोलणं झालं आहे. सगळ्या शिक्षक संघटना मला पाठिंबा देतील, असा माझा विश्वास आहे. शिक्षकांचे अनेक प्रश्न आहे. शिक्षक भरती, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. संघटनांनी मला पाठबळ दिलं आहे.