धुळ्यात जाऊबाई जोरात, ग्रामपंचायत निवडणुकीत सख्ख्या जावांमध्ये सामना

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात 28 गावांपैकी दहिवद आणि मांडळ येथे दोन जावा एकमेकांविरुद्ध ग्रामपंचायत निवडणुकीत उभ्या आहेत.

धुळ्यात जाऊबाई जोरात, ग्रामपंचायत निवडणुकीत सख्ख्या जावांमध्ये सामना
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 7:52 PM

धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात 28 गावांपैकी दहिवद आणि मांडळ येथे दोन जावा एकमेकांविरुद्ध (Sister In Law Vs Sister In Law In Gram panchayat Election) ग्रामपंचायत निवडणुकीत उभ्या आहेत. मोठी जाऊ विरुद्ध लहान जाऊ अशी लढत इथे पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत कोणती जाऊ विजयी होते, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. मात्र, या जावांमधील रस्सीखेच सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहे (Sister In Law Vs Sister In Law In Gram panchayat Election).

जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा अन्य कोणत्याही स्वराज्य संस्थेची निवडणूक असो. अशा निवडणुकीत दरवेळी आपले नशीब आजमावण्यासाठी आणि निवडणुकीचा दांडगा अनुभव असलेल्या राजकारणी भाऊबंदकीतील व्यक्ती यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत आहेत. ग्रामपंचायतीतील सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत अजून बाकी असल्याने नात्यातील व्यक्ती यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

शिरपूर तालुक्यातील मंडळ येथे प्रभाग क्रमांक 1 ब मधून मोहिनी दिनेश माळी या लहान जावेविरोधात जयश्री गोपाल माळी ही मोठी जाऊ निवडणुकीच्या रिंगणात आहे. दहिवद येथे माजी सरपंच जगन्नाथ भिला पाटील यांची सून वृषाली चुनीलाल पाटील या लहान जावेविरोधात माजी उपसरपंच रवींद्र पाटील यांची पत्नी या नात्याने मोठी जाऊ असलेल्या आशाबाई पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामुळे 18 तारखेला होणाऱ्या मतमोजणीनंतर कोणती जाऊ सरपंच पदी विराजमान होते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून आहे.

ग्रामपंचायत निवडणूक

14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात एप्रिल ते डिसेंबरमध्ये या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून, 15 जानेवारीला मतदान होणार आहे, तर 18 जानेवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे.

एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित सुमारे एकूण 14,234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम संगणकीकृत पद्धतीनं राबविणार असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. कोरोनाच्या साथीच्या आजाराच्या संसर्गाची गंभीर परिस्थिती उद्भवल्यानं मार्च 2020मध्ये सुमारे 1566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका निवडणूक आयोग्याच्या आदेशानुसार 17 मार्च 2020ला स्थगित करण्यात आल्या होत्या.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.

Sister In Law Vs Sister In Law In Gram panchayat Election

संबंधित बातम्या :

ग्रामपंचायतीसाठी अर्ज मागे घेण्याची वेळ संपली; आता प्रचाराचं धुमशान!

मराठवाड्यातील एका गावात 25 वर्षानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणूक!

ग्रामपंचायतीचा धुरळा: नांदेडच्या तामसामध्ये महाविकासआघाडी पॅटर्न, काँग्रेस शिवेसना नेत्यांची युती

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.