पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर एसटी बसचा भीषण अपघात, 27 प्रवासी जखमी

पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर एसटी बसचा भीषण अपघात झालाय. या अपघातात तब्बल 27 प्रवासी जखमी झाले आहेत. भरधाव एसटी बसने टोल नाक्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने ही अपघाताची घटना घडली. या अपघातात बसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झालाय.

पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर एसटी बसचा भीषण अपघात, 27 प्रवासी जखमी
पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर एसटी बसचा भीषण अपघात
Follow us
| Updated on: May 26, 2024 | 7:13 PM

चाळीसगाव एसटी बसचा भीषण अपघात घडला आहे. मुंबई-आग्रा महामार्गवरील पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर ही अपघाताची घटना घडली. एसटी बसने ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात 27 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्व जखमींमा पिंपळगाव पसवंत येथील शासकीय आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संबंधित घटनेमुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. एसटी बसचा ब्रेकफेल झाल्यामुळे ही अपघाताची घटना घडली अशी माहिती समोर येत आहे.

नेमकं काय घडलं?

चाळीसगाव आगाराची एसटी क्रमांक एम एच 40 एन 98 17 ही बस चाळीसगाव येथून कल्याणच्या दिशेने जात होती. या दरम्यान मुंबई-आग्रा महामार्गवरील पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर 13 नंबर लेनवर ही एसटी भरधाव वेगाने आली. यावेळी या एसटी बसचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बसने समोर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. यात बसमध्ये असलेल्या जवळपास 27 प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. या जखमी प्रवाशांना खाजगी आणि शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. घटनेमुळे प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे.

एसटी बसेसची दुरावस्था

मुंबई-आग्रा महामार्गावर खान्देशाच्या दिशेला जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावर नेहमी ठिकठिकाणी एसटी महामंडळाच्या बंद झालेल्या गाड्या नेहमी बघायला मिळतात. या गाड्या रस्त्यातच धोका देतात. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागतं. एसटीला लालपरी म्हटलं जातं. लालपरीचा प्रवास अनेकांना आवडतो. पण याच लालपरीची अवस्था बिकट झालीय. अनेक गाड्या या जुन्या झाल्याने लांबच्या प्रवासावेळी धोका देतात. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. या जुन्या झालेल्या बसेसचं प्रशासनाला काही नियोजन करता येईल का? हा मोठा प्रश्न आहे.

दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.