St Worker Protest : अशा प्रकारची घटना कधीही योग्य नाहीच, पवारांच्या घारबाहेरील आंदोलनावर राज्यपालांची पहिली प्रतिक्रिया
शिवसेनेला गृहमंत्री पद हवं आहे म्हणून तर हे घडवून आणलं नाही ना, अशी शंका भाजप नेते व्यक्त करत आहेत. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपकडे इशारा केला आहे. त्यामुळे जोरदार खडाखडी सुरू आहे. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिक : राज्यात सध्या एकच विषय गाजतोय तो म्हणजे शुक्रवारी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर झालेले एसटी कर्मचाऱ्यांचे आक्रमक आंदोलन (St Worker Protest). मुख्यमंत्र्यांपासून ते गृहमंत्र्यांपर्यंत सर्व नेते या आंदोलनाची मूळंपाळं शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर विविध माध्यमातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजप आणि शिवसेना यांच्यात मात्र आता यावरून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे पुन्हा नवा वाद पेटला आहे. शिवसेनेला गृहमंत्री पद हवं आहे म्हणून तर हे घडवून आणलं नाही ना, अशी शंका भाजप नेते व्यक्त करत आहेत. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपकडे इशारा केला आहे. त्यामुळे जोरदार खडाखडी सुरू आहे. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यपाल काय म्हणाले?
पवारांच्या घराबाहेर आंदोलनाबाबत बोलताना राज्यपाल म्हणाले, मुख्यमंत्री या विषयाला हाताळत आहेत, ते समजदार व्यक्ती आहेत. स्वतः शरद पवार मोठे आणि प्रतिष्ठित नेते आहेत. अशा प्रकारची घटनेला कोणीही योग्य म्हणणार नाही. त्यामुळे अशा घटना होऊ नये यासाठी सरकार लक्ष देईल. अशी प्रतिक्रिया रारज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्या अमरावतीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उद्या अमरावतीत पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आधी 150 ते 200 पोलिसांचा होता, मात्र आता बंदोबस्तात 300 पोलीस तैनात राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.
नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?
या आंदोलनावर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलकांचा हेतू पवार साहेब आणि सुप्रिया सुळेंना आणि पवार कुटूंबियांना इजा पोहोचवण्याचा असावा, असं माझं निरीक्षण आहे. त्यांना जर त्यांच्या भावना पोहचवाच्या होत्या तर त्यांनी निदर्शनं केली असती. एखादा व्यक्ती उद्दामपणे सातत्याने हिंसेची धमकी देतो त्यावर आधीच प्रतिबंधात्मक कारवाई होणं आवश्यक होतं, असेही त्या म्हणाल्या आहेत. पोलिसांवर सातत्याने आरोप होत असल्यामुळे त्यांचे नितीधर्य खच्चलं की काय हे बघायला पाहिजे, असे सूचक विधानही त्यांनी केले आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा चौकशीचा ससेमिरा लागाण्याच्या भीतीमुळे काही पोलीस अधिकारी निष्क्रिय झाले आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.
Anand Paranjpe: तर आम्हीही दुप्पट चोप देऊ शकतो; आनंद परांजपे यांचा मनसेला इशारा