नाशिकः शेतकऱ्यांची लूट करायची इरसाल पद्धत; पठ्ठ्यांनी बाजार समितीच्या वजन काट्यालाच बांधला दगड

राज्यातल्या मोठ्या बाजार पेठेमध्ये गणल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंतमध्ये शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या अक्षरशः लूट सुरू आहे. टोमॅटोचो वजन कमी भरावे म्हणून बाजार समितीच्या वजन काट्यालाच दगड बांधल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

नाशिकः शेतकऱ्यांची लूट करायची इरसाल पद्धत; पठ्ठ्यांनी बाजार समितीच्या वजन काट्यालाच बांधला दगड
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 1:07 PM

नाशिकः राज्यातल्या मोठ्या बाजार पेठेमध्ये गणल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंतमध्ये शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या अक्षरशः लूट सुरू आहे. टोमॅटोचो वजन कमी भरावे म्हणून बाजार समितीच्या वजन काट्यालाच दगड बांधल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. (Stones tied to the scales of the market committee to reduce the weight of tomatoes)

कोणीही या आणि शेतऱ्यांना खुशाला लुटा, ओरबडा असेच झाले आहे. सध्या एकीकडे पावसाने पीक मातीमोल होत आहे. सोयबानीचे वाढलेले भाव झपाट्याने उतरणीला लागले आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या अनेक गावांत ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती आहे. दुसरीकडे मात्र पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोचे वजन कमी भरावे म्हणून थेट वजन काट्यालाच दगड बांधल्याचा प्रताप घडला आहे. या प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शेतकऱ्यांमध्ये पराकोटीचा संताप आहे. नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक आपला माल विकण्यासाठी पिंपळगाव बाजारपेठेला पसंती देतात. मात्र, येथे अक्षरशः शेतकऱ्यांना ओरबाडने सुरू झाले आहे. सध्या अनेक ठिकाणी पावसामुळे टोमॅटो मातीमोल होतो आहे. कित्येक शेतकऱ्यांनी भाव मिळत नसल्याने गेल्याच महिन्यात टोमॅटो रस्त्यावर फेकून दिला होता. इतके भाव पडलेले असतानाही पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मात्र अजूनही शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. ही लूट करण्याची इरसाल पद्धतही त्यांनी शोधून काढली आहे. चक्क वजनकाट्यालाच प्लास्टिकच्या पिशवीत दगड बांधण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. बाजार समिती प्रशासनाविरुद्ध शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

कोट्यवधींचा लावला चुना

पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांच्या वजन काट्याची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 21 सप्टेंबर रोजी 7 हजार 59 शेतकऱ्यांनी आणलेल्या तब्बल 8 कोटी 22 लाख 53 हजार 500 रुपयांच्या टोमॅटोचे बाजार समितीत लिलाव झाले होते. या व्यापाऱ्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांना कोट्यवधींचा चुना लावण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

पिकांचे नुकसान

साकोरीमध्ये पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेल्यात जमा आहे. सध्या खरीप हंगाम सुरू आहेत. दसरा, दिवाळीचे सण तोंडावर आले आहेत. खरिपाचे पीक आले, तर हातात चांगला पैसा खुळखुळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, या आशेवर पावसाने सध्या तरी पाणी फिरले आहे. सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. त्यातच पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील फसवणुकीचा प्रकार उघड झाल्याने शेतकऱ्यांंमध्ये कमालीचा संताप आहे (Stones tied to the scales of the market committee to reduce the weight of tomatoes)

इतर बातम्याः 

नाशिकः राज ठाकरेंच्या जंगी स्वागताने पोलीस आयुक्त तापले; कायद्याचे उल्लंघन केल्यास निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार

चर्चा तर होणारचः नाशिकमध्ये 40 प्रभाग तीन सदस्यांचे, एक 2 सदस्यांचा; महाविकास आघाडीची मोट बांधणार का?

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.