नाशिकमध्ये कोरोना डेल्टा व्हेरिएंटचा धोका, निर्बंधांच्या कडक अंमलबजावणीला सुरुवात
नाशिक शहरासह जिल्हाभरात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा धोका वाढलाय. हा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासन अलर्ट झालंय. ज्या भागात असे रुग्ण आढळले त्या भागात कंटेनमेंट झोन घोषित करून आजपासून कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
नाशिक : नाशिक शहरासह जिल्हाभरात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा धोका वाढलाय. हा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासन अलर्ट झालंय. ज्या भागात असे रुग्ण आढळले त्या भागात कंटेनमेंट झोन घोषित करून आजपासून कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणाही सतर्क झालीय.
नाशिक जिल्ह्यात कोरोना डेल्टा व्हेरिएंटचे 30 रुग्ण आढळून आलेत. यातील 2 रुग्ण शहरात तर 28 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. संसर्ग नियंत्रणासाठी सर्व रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याचे निर्देश देण्यात आलेत.
नाशिकमधील कोरोना रुग्णांची आकडेवारी
#Nashik District #CoronaUpdates 07 AUG 2021 AT 06.00 PM#Corona #coronavirus #COVID #CoronaVirusUpdate pic.twitter.com/zWAaZsW2gI
— DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK (@InfoNashik) August 7, 2021
कोरोनाच्या कुठल्याही व्हेरियंटचा सामना करण्यासाठी लसीकरण हाच शाश्वत पर्याय : छगन भुजबळ
कोरोना बाधितांची रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोनाच्या कुठल्याही व्हेरियंटचा सामना करण्यासाठी लसीकरण हाच शाश्वत पर्याय आहे. त्यासाठी लसीकरणावर भर देवून त्याची गती वाढविण्यात यावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यात डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले तरी त्यातील अनेक रुग्ण आता बरे झाले आहेत. परंतु कोरोनाशी संबंधित असणाऱ्या विषाणूंचा प्रसार होऊ नये यासाठी वेळीच नियंत्रण आणणे आवश्यक असल्याने बाहेरून येणाऱ्या नागरिकांची रँडम तपासणी करण्यात येवून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात यावा. त्याचप्रमाणे सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची देखील डेल्टा तपासणी करण्यात येवून संबंधित रुग्णांवर वेळेत आवश्यक उपचार करावेत. कोरोना व त्यासंबंधीच्या विविध विषाणूंचा सामना करण्यासाठी वेळीच लसीकरण केल्यास नागरिकांची प्रतिकार शक्ती निश्चितच वाढण्यास मदत होईल. त्यामुळे लसीकरणाचा पहिला डोस नागरिकांना उपलब्ध होईल यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
विषाणू कोणताही असो त्यापासून स्वत: सोबत आपल्या कुटूंबाचा व निकटवर्तीयांचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे देखील गरजेचे आहे. याअनुषंगाने कोरोनाची भिती पूर्णत: संपलेली नसल्याने नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
हेही वाचा :
कोरोनाच्या कुठल्याही व्हेरियंटचा सामना करण्यासाठी लसीकरण हाच शाश्वत पर्याय : छगन भुजबळ
नाशिकमध्ये डेल्टा व्हॅरिएंटचे 30 रुग्ण आढळले, आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर, तातडीची बैठक सुरू
VIDEO: परळी-बीड-नांदगाव मार्गावरील बसचा येवल्यात अपघात, 42 जण जखमी, 2 गंभीर
व्हिडीओ पाहा :
Strict restriction implementation in Nashik amid Corona Delta variant