“आमच्या मागण्या पालकमंत्र्यांच्या लेव्हलवर नाहीत”; ‘या’ मंत्र्याला शेतकऱ्यांनी सुनावले…
आमची ही मागणी अवास्तव नाही मात्र जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत ही सक्तीची वसुली आणि लिलाव प्रक्रिया थांबवावी अशीही मागणी करण्यात आली आहे.
मालेगावः नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची जमीन वसूल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे 65 हजार शेतकऱ्यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू झाल्याने शेतकऱ्यांसह आता शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे आता जमीन लिलाव प्रक्रिया थांबवण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली आहे.
त्यांनी यावेळी नाशिक जिल्हा बँकेला इशारा देत हजारोंच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरतील असा इशारा बँकेसह पालकमंत्री दादा भुसे यांना दिला आहे. त्यामुळे उद्या हजारोंच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नाशिक जिल्हा बँकेकडून जमीन लिलाव प्रक्रिया केली जात असल्याने सर्व शेतकऱ्यांना 6 टक्के व्याज दराने सरळ व्याज आकारणी करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.
ही मागणी मान्य करण्यात आली तर सगळे शेतकरी कर्ज भरायला तयार असल्याचेही मत व्यक्त करण्यात आले आहे. यावर बोलताना राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.
आमची ही मागणी अवास्तव नाही मात्र जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत ही सक्तीची वसुली आणि लिलाव प्रक्रिया थांबवावी अशीही मागणी करण्यात आली आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या कर्जाविषयी बोलताना सांगितले की, बँक बुडावी अशी कोणत्याही शेतकऱ्याची इच्छा नाही मात्र मूळ कर्जाच्या चार पट रक्कम भरावी लागते, हे अन्यायकारक आहे असंही त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
मात्र धन दांडग्या शेतकऱ्यांवर आर्थिकगैर व्यवहाराचे गुन्हे दाखल करा. तसेच त्यांच्यावर काहीही कारवाई करा, आम्हाला त्याचे काही देणे घेणे नाही असंही त्यांनी स्पष्ट म्हटले आहे.
मात्र बँकेकडून शेतकऱ्यांच्या कर्जामुळे लिलावातील मालमत्ता कवडीमोल भावात विकली जाते, हे अन्यानकारक असल्याचे मत राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
तसेच बँक बुडावी अशी कोणत्याही शेतकऱ्याची इच्छा नाही मात्र जिल्हा बँक वाचवण्यासाठी सरकारने विशेष धोरण राबवावे अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी जमिनीसाठी आंदोलन पुकारले असल्यामुळे आमच्या मागण्या पालकमंत्र्यांच्या लेव्हल वर नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी आमच्या मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.
जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार आहे. तसेच वणीपासून मालेगावपर्यंत हे मोर्चा आंदोलन होणार असून जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.