कर्नाटकमधील काही संघटनांच्या नतद्रष्ट भूमिकेमुळे सातत्याने संघर्ष; सीमावादावर ठाकरे गटाने स्पष्ट मत
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात महाराष्ट्राचा अभिमन्यू करण्याची कुणाची भूमिका असेल तर तो चक्रव्यूह कसा भेदयचा, हे महाराष्ट्राची जनता जाणून आहे अशी टीकाही त्यांनी केंद्रावर आणि राज्य सरकारवर केली आहे.
मालेगावः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद जोरदारपणे उफाळून आला असल्याने राज्य सरकारसह कर्नाटकातील सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांवर दावा केल्यानंतर हा वाद आणखी चिघळला आहे. त्यावर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मत व्यक्त करताना त्यांनी कर्नाटक सराकरवर टीका केली आहे.
सीमावादावर बोलताना त्या म्हणाल्या की, कर्नाटकमधील काही संघटनांच्या नतद्रष्ट भूमिकेमुळे सातत्याने हा संघर्ष सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
एखाद्या देशाच्या पंतप्रधानांनी चौकीवर अधिकार मागवा त्याप्रमाणे हे वागणं सुरू आहे असा टोला त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला लगावला आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात महाराष्ट्राचा अभिमन्यू करण्याची कुणाची भूमिका असेल तर तो चक्रव्यूह कसा भेदयचा, हे महाराष्ट्राची जनता जाणून आहे अशी टीकाही त्यांनी केंद्रावर आणि राज्य सरकारवर केली आहे.
त्याचप्रमाणे कर्नाटकातील जे सीमाबांधव आहेत त्यांच्याविषयीही त्यांनी आपली भूमिका मांडत असताना आम्ही त्यांच्यासोबत असल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी हिवाळी अधिवेशनातील विषयावरही आपले मत त्यांनी व्यक्त केले. समाजकल्याण विभागानी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील आणि इतर विभागांनी जिल्हानिहाय याची माहिती ठेवण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
त्याच बरोबर वसतिगृहातील विद्यार्थिनींचीही माहितीही महिला अधिकाऱ्यांनी ठेवावी. मुलींच्या अडचणी त्यांच्या तक्रारीरी काही असतील तर त्याचीही दखल अधिकाऱ्यांनी घेण्याची सूचना त्यांनी केली.