Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवारांच्या मेहरबानीवर ठाकरेंचे सुरू, राज्यपाल चुकतील असे वाटत नाही; राणेंचा दावा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याबद्दल प्रश्न विचारला असता राणे म्हणाले की, राज्यपाल यांचाकडून चूक होईल असे मला वाटत नाही. मात्र, मी भाषण बघितलं नाही. त्यावर नंतर प्रतिक्रिया देईल.

पवारांच्या मेहरबानीवर ठाकरेंचे सुरू, राज्यपाल चुकतील असे वाटत नाही; राणेंचा दावा
शरद पवार आणि उद्धव ठाकरे.
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 4:19 PM

नाशिकः केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मंगळवारी नाशिकमध्ये (Nashik) जोरदार टोलेबाजी केली. पवारांच्या मेहरबानीवर तुमचे सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, असा दावा त्यांनी केला. विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. राणे म्हणाले, ते मंत्रालयात जात नाहीत, कुठे जात नाहीत. टीका काय करता, टोमणे काय मारता. मराठी तरुण आज उध्वस्त होतोय. इथली मुले वसई विरारच्या पुढे गेले. तिथे मोठ्या इमारती झाल्या. तिथे यांची पार्टनरशीप आहे. यांचे वाचन तरी आहे का. पवारांची मेहेरबानी. त्यांनी जमवाजमव केली आणि सगळे केले, असा दावा त्यांनी केला.

राऊतांच्या मनात काय?

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, संजय राऊत चांगली सुरुवात करत आहेत. मात्र, त्यांचापेक्षा जास्त लोकांची यादी माझ्याकडे आहे. संजय राऊत यांनी यादी दिली, तर मी देखील देणार. संजय राऊत यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची पाहिजे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्री होणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

राज्यपाल चुकतील वाटत नाही…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याबद्दल प्रश्न विचारला असता राणे म्हणाले की, राज्यपाल यांचाकडून चूक होईल असे मला वाटत नाही. मात्र, मी भाषण बघितलं नाही. त्यावर नंतर प्रतिक्रिया देईल. दिशा सालियानच्या बाबतीतही ते बोलले. ते म्हणाले, आम्ही दिशाची बदनामी केली नाही. उलट दिशाच्या कुटुंबातील व्यक्तींनी आमचे आभार मानले पाहिजेत. आम्ही न्याय मिळवून देत आहोत. राज्यात कायदा सुव्यवस्था नाही. सुशांतची हत्या झाली होती. ती आत्महत्या दाखवली. राष्ट्पटी राजवट लागू होण्याचे भविष्य सुधीर मुनगंटीवार सांगत आहेत. ते खरे ठरो, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांना आणणे सुरू…

केंद्रीय मंत्री राणे यांना यावेळी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी हा प्रश्न संजय राऊत यांनी विचारायला लावला का, असा प्रतिप्रश्न केला. पुढे म्हणाले की, अनेक विद्यार्थ्यांना आणले जात आहे. भारताकडून प्रयत्न केले जात आहेत. भारत सरकारकडून मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याला जी असेल ती मदत केली जाईल. चांगले काम केले तर चांगले म्हणा, असे आवाहन त्यांनी केले.

इतर बातम्याः

रशियाच्या राजनैतिक मिशनच्या 12 सदस्यांची हकालपट्टी, युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे मोठे पाऊल

tv9 Explainer: रशिया यूक्रेनमध्ये घुसला खरा पण गेल्या 5 दिवसात त्याला त्यात किती यश आलंय? समजून घेऊया 10 मुद्यांच्या माध्यमातून

Russia Ukrane War: तब्बल 64 KM चा रशियन ताफा, कीवला घेरण्यासाठी रशिया सज्ज

लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या...
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या....
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?.
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली.
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या.
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?.
वाह.. फरफटत नेले, हल्ला केला तरीही 'ती' भिडली चोरट्यांना अन्...
वाह.. फरफटत नेले, हल्ला केला तरीही 'ती' भिडली चोरट्यांना अन्....
दानवेंच्या नावाचं गार्‍हाणं घेऊन खैरे मातोश्रीवर दाखल
दानवेंच्या नावाचं गार्‍हाणं घेऊन खैरे मातोश्रीवर दाखल.
मुंडेंची सर्व कुंडली कराडकडे..., करूणा शर्मांकडून एन्काऊंटरची भीती अन्
मुंडेंची सर्व कुंडली कराडकडे..., करूणा शर्मांकडून एन्काऊंटरची भीती अन्.
'मुंडेंनाच कराड नको', म्हणणाऱ्या निलंबित PSI वर अ‍ॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा
'मुंडेंनाच कराड नको', म्हणणाऱ्या निलंबित PSI वर अ‍ॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा.