ना गाडी ना घोडा, नवरदेवाने लाडक्या नवरीला नेले असे की पंचक्रोशीत होते कौतुक

श्रीमंत लोकं हेलिकॅप्टरने नवरीला घेऊन जातात. पण, एका युवकाने चक्क बैलगाडीतून नवरीला घेऊन निघाला.या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

ना गाडी ना घोडा, नवरदेवाने लाडक्या नवरीला नेले असे की पंचक्रोशीत होते कौतुक
Follow us
| Updated on: Jun 17, 2023 | 9:41 PM

उमेश पारीक, प्रतिनिधी, लासलगाव, नाशिक : लग्न धुमधडाक्यात झाले पाहिजे, असा बहुतेकांचा आग्रह असतो. त्यासाठी ऐपतीप्रमाणे प्रत्येकजण खर्च करतो. गाडी किंवा घोडा हे लग्नात सहसा असतेच. श्रीमंत लोकं हेलिकॅप्टरने नवरीला घेऊन जातात. पण, एका युवकाने चक्क बैलगाडीतून नवरीला घेऊन निघाला.या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. लग्नसराईत वेगवेगळ्या शक्कल लावत नवरदेव आपल्या नवरींना आपल्या घरी घेऊन जात असतात.

निफाड तालुक्यातील उंबरखेड येथील नवरदेवाने चक्क बिदाईनंतर आपल्या लाडक्या नवरीला बैलगाडीत बसून आपल्या घरी नेले. या अनोख्या बिदाईची सर्वत्र मोठी चर्चा झाली आहे.

हे सुद्धा वाचा

नवरीला बसवले बैलगाडीत

निफाड तालुक्यातील उंबरखेड येथील रमेश रघुनाथ गवळी यांचे चिरंजीव अक्षय तसेच दत्तात्रेय प्रभाकर कागदे यांची मुलगी हिनल या दोघांचा शुभविवाह संपन्न झाला आहे. लग्नात दिवसभर लग्नाचे विविध कार्यक्रम झाले. त्यानंतर ज्यावेळेस बिदाईची वेळ आली त्यावेळी वऱ्हाडी मंडळींनी सजवलेल्या बैलगाडीत नवरदेवाने आपल्या नवरीला बसवत आपल्या घरी घेऊन गेला.

अनोखी लग्न पत्रिका छापली

दुसरीकडे, नगरच्या जाधव कुटुंबीयांनी अनोखी लग्न पत्रिका छापली आहे. पत्रिकेमध्ये नातेवाईकांची नावे टाकण्यापेक्षा त्यांनी सरकारच्या योजनांची माहिती दिली आहे. यामध्ये आयुष्यमान भारत, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी यासारख्या महत्वाच्या आरोग्य योजनांसह इतरही योजनांची माहिती छापण्यात आली आहे.

शेकडो कुटुंबांना आपण लग्नाची पत्रिका पोहचवतो. या माध्यमातून या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचल्यास त्याचा लोकांना अधिक फायदा होवू शकतो ही भूमिका जाधव कुटुंबाने व्यक्त केलीय.

असे हे लग्नसोहळे सर्वत्र चर्चेचा विषय ठरतात. एकीकडं बैलगाड्या कमी होत असताना अजूनही काही जण बैलगाडीतून नवरीला घेऊन जातात. दुसरीकडे लग्नाची अनोखी पत्रिका छापून नवदाम्पत्याने सरकारी योजनांची मदत केली आहे. या दोन्ही घटनांची चर्चा गावात आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.