कुत्रा नाही, बिबट्या पडला होता विहिरीत! वेळीच लक्षात आल्यानं टळला अनर्थ, पाहा Video

सिन्नरला (Sinnar) विहिरीत कुत्रे (Dog) पडल्याचा समज झाल्याने दोरखंडाच्या साहाय्याने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हे करायला गेलेल्या शेतकऱ्यांना (Farmers) विहिरीत कुत्रे नसून बिबट्या (Leopard) असल्याचे दिसताच धक्का बसला.

कुत्रा नाही, बिबट्या पडला होता विहिरीत! वेळीच लक्षात आल्यानं टळला अनर्थ, पाहा Video
विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागानं सुखरूप काढलं बाहेरImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 12:35 PM

नाशिक : सिन्नरला (Sinnar) विहिरीत कुत्रे (Dog) पडल्याचा समज झाल्याने दोरखंडाच्या साहाय्याने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हे करायला गेलेल्या शेतकऱ्यांना (Farmers) विहिरीत कुत्रे नसून बिबट्या (Leopard) असल्याचे दिसताच धक्का बसला. शेतकऱ्याने प्रसंगावधान राखून वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर चार तासांच्या बचाव कार्यानंतर एक वर्षाच्या बिबट्याला सिन्नर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढले आहे. यावेळी आसपासच्या परिसरातील ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. कुत्रा नसून बिबट्या असल्याचे लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला अन्यथा या बिबट्याने अनेकांना जखमी केले असते. दरम्यान, वनविभागाने याठिकाणी येत विहिरीत अडकलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढून पिंजऱ्यात बंद केले. तर शेतकऱ्यांनी बिबट्या जेरबंद झाल्यानंतर सुटकेचा नि:श्वास टाकला.

हिंस्त्र प्राणी वस्तीत

बिबट्यासारखा हिंस्त्र प्राणी वारंवार गाव आणि शहराकडे धाव घेण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. मानवाने प्राण्यांचा अधिवास बळकावला. जंगलांची अक्षरशः कत्तल केली. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. पर्जन्य चक्रात प्रचंड बदल झाले आहेत. एकाचवेळी अतिवृष्टी आणि एकाचवेळी दुष्काळाचा अनुभव आपण घेत आहोत.

अलिकडेच एक बिबट्या केला होता जेरबंद

निफाड तालुक्यातील चांदोरी येथे मुक्तसंचार करत जनावरांवर हल्ला करणारा बिबट्या (leopard) अखेर जेरबंद करण्यात आला होता. त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिक आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. चांदोरी येथील जगन्नाथ सोनवणे यांच्या शेतात बिबट्याचा मुक्तसंचार सुरू होता. त्यामुळे वनविभागाने (Forest Department) या ठिकाणी एक पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात आज पहाटेच्या दरम्यान सावजच्या शोधात आलेला बिबट्या अडकला. मात्र, अजूनही दोन ते तीन बिबटे या परिसरात असल्याने त्यांनाही जेरबंद करा. हा परिसरा बिबट्या मुक्त करावा, अशी मागणी यावेळी वन विभागाकडे जगन्नाथ सोनवणे यांच्यासह शेतकरी व नागरिकांनी केली.

आणखी वाचा :

CCTV | तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला, Nashik मध्ये तीन वर्षांचा चिमुरडा आश्चर्यकारकरित्या बचावला

नाशिकमधील तांदूळ घोटाळाप्रकरणी बचत गटाची रक्कम गोठवा; चौकशी समितीची संचालकांना शिफारस

Sangli Murder | दारुच्या नशेत बाप-लेकाची भांडणं, मुलाकडून 70 वर्षीय पित्याची हत्या

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.