Malegaon | ठेकेदारच्या निष्काळजीपणामुळे सुरगाणा तालुक्यातील नागरिकांचे हाल, पुराच्या पाण्यातून करावा लागतोयं प्रवास
तान नदीवर कमी उंचीचा पुल करून नवीन पुलाचे काम चालु केले होते. पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण होऊ न शकल्याने जामुनपाडा-खांदुर्डी गावातील नागरिक मोठा त्रास सहन करत आहेत. पाऊस कमी होताच नदीवर अपूर्ण असलेल्या पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

मालेगाव : नाशिकच्या (Nashik) सुरगाण्यांमध्ये पावसाचा हाहा: कार सुरूयं. नदी, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. सन 2022 मध्ये जामुनपाडा गावाला जोडणाऱ्या तान नदीवर कमी उंचीचा पुल करून नवीन पुलाचे काम चालु केले होते, परंतु ठेकेदारच्या निष्काळजीपणामुळे (Carelessness) पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण होऊ न शकल्याने जामुनपाडा-खांदुर्डी गावातील ग्रामस्थांना बाजार, दवाखाना, शाळेत व इतर अत्यावश्यक सेवेसाठी (Essential services) पुराच्या पाण्यातून शर्तीचे प्रयत्न करून नदी पार करावी लागत आहे.
नाशिक जिल्हात जोरदार पावसाने हजेरी लावली
राज्यासह नाशिक जिल्हात जोरदार पावसाने हजेरी लावलीयं. यामुळे नाशिक जिल्हातील नद्यांना पूर आला आहे. पूल आणि रस्ते चांगले नसल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे देखील अवघड होऊन बसले आहे. त्यामध्येही जामुनपाडा-खांदुर्डी गावालगत असलेल्या नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने पुराचे पाणी पुलाच्या वरून वाहत असल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतोयं. या पुराच्या पाण्यामुळे नागरिकांना बाजार आणि दवाखान्यात जाणे देखील शक्य होत नाहीयं. इतकेच काय तर गावातील मुलांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.



तान नदीवरील कमी उंचीच्या पुलामुळे ग्रामस्थांचे हाल
तान नदीवर कमी उंचीचा पुल करून नवीन पुलाचे काम चालु केले होते. पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण होऊ न शकल्याने जामुनपाडा-खांदुर्डी गावातील नागरिक मोठा त्रास सहन करत आहेत. पाऊस कमी होताच नदीवर अपूर्ण असलेल्या पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. कारण परत जोरदार पाऊस झाला तर पुराचे पाणी पुन्हा पुलावरून वाहन्याची दाट शक्यता असल्याने पाऊस थांबल्यावर लगेचच पुलाचे काम पुन्हा सुरू करावे, अशी मागणी आता जोर धरू लागलीयं.