Nashik |नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीतील गणेशोत्सव आणि दहीहंडी नियमांचे उल्लंघन प्रकरणी दाखल गुन्ह्यांच्या माहितीची संकलन प्रक्रिया सुरू…

प्रशासनाकडून गणेश मंडळाप्रमाणेच दहीहंडीसाठी देखील खास नियमावली तयार केली जाते. यामध्ये प्रामुख्याने किती थर लावायचे हे सांगितले जाते. जर एखाद्या दहीहंडी आयोजकांच्या दहीहंडीमध्ये त्यापेक्षा अधिक थर लावले गेले तर पोलिसांकडून कारवाई करत संबंध व्यक्तींवर गुन्हे दाखल केले जातात.

Nashik |नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीतील गणेशोत्सव आणि दहीहंडी नियमांचे उल्लंघन प्रकरणी दाखल गुन्ह्यांच्या माहितीची संकलन प्रक्रिया सुरू...
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 10:12 AM

नाशिक : राज्य सरकारने एक अत्यंत मोठा निर्णय (Decision) घेतलायं. गणेशोत्सव आणि दहीहंडी दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी दाखल असलेले गुन्हे मागे घेत अनेकांना दिलासा दिलायं. राज्यात एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांनासोबत घेत मोठी बंडखोरी केली. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपाचे (BJP) सरकार आले. दहीहंडी उत्सवावर अगोदरच्या सरकारने जे काही निर्बंध घातले होते. ते सर्व निर्बंध हटवत मोठे गिफ्ट सरकारने दिले. इतकेच नाही तर गणेशोत्सव आणि दहीहंडी दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी दाखल असलेले गुन्हे (Crime) मागे घेण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतलायं.

दाखल गुन्ह्यांच्या माहितीचे संकलन करण्याची प्रक्रिया सुरू

या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीतील दाखल गुन्ह्यांच्या माहितीचे संकलन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पोलीस आयुक्तालयासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलीय. तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलीयं. दरवर्षी प्रशासनाकडून गणेश मंडळांसाठी खास नियमावली तयार केली जाते, या नियमांचे उल्लंघन केल्यावर गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात.

हे सुद्धा वाचा

 पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

प्रशासनाकडून गणेश मंडळाप्रमाणेच दहीहंडीसाठी देखील खास नियमावली तयार केली जाते. यामध्ये प्रामुख्याने किती थर लावायचे हे सांगितले जाते. जर एखाद्या दहीहंडी आयोजकांच्या दहीहंडीमध्ये त्यापेक्षा अधिक थर लावले गेले तर पोलिसांकडून कारवाई करत संबंध व्यक्तींवर गुन्हे दाखल केले जातात. आता यासंदर्भातच राज्य सरकारने मोठा निर्णय घेते गणेशोत्सव आणि दहीहंडी दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याने ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, ते गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...