Trekking Accident | दोघेही पक्के ट्रेकर, पण ठिसूळ दगड निसटले, 120 फूट खोल दरीत कोसळलेल्या तरुणांसोबत काय घडलं ?

नाशिकमधील (Nashik) शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी (Trekking) आलेल्या दोन  तरुणांचा तोल जाऊन सुमारे एकशे दहा फूट खोल दरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. डोंगरावरुन खाली पडल्यामुळे या तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर यातील एक तरुण जखमी झाला असून ट्रेकिंग करणारे इतर 12 जण सुखरूप आहेत.

Trekking Accident | दोघेही पक्के ट्रेकर, पण ठिसूळ दगड निसटले, 120 फूट खोल दरीत कोसळलेल्या तरुणांसोबत काय घडलं ?
nashik trekker accident
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 8:35 AM

नाशिक : नाशिकमधील (Nashik) शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी (Trekking) आलेल्या दोन तरुणांचा तोल जाऊन सुमारे एकशे वीस फूट खोल दरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. डोंगरावरुन खाली पडल्यामुळे या तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर यातील एक तरुण जखमी झाला असून ट्रेकिंग करणारे इतर 12 जण सुखरूप आहेत. या घटनेनंतर नाशिक जिल्हा हादरला असून रापली, कातरवाडी, मनमाड शहरातील तरुणांनी रेस्क्यू ऑपरेशन करत सर्वांना सुखरूप पायथ्याशी आणण्यात यश मिळवले. मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर (Ahmednagar) येथील असलेले इंद्रप्रस्थ ट्रेकर्स या ग्रुपचे एकूण 15 सदस्य मनमाड शहराजवळ असलेल्या हडबीची शेंडी, थमसप म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी आले होते. या ग्रुपमध्ये 8 मुली तर 7 मुले होते. यातील मुलांमध्ये दोन जण सराईत ट्रेकर होते.

सुखरुप वर चढले, मात्र खाली परतताना झाला अपघात

ट्रेकिंगला आलेल्यांपैकी मयूर दत्तात्रय म्हस्के, अनिल शिवाजी वाघ या दोघांनी वर चढण्यासाठी असलेल्या जुन्या बोल्डिंगवर रोप लावला होता. रोपद्वारे सर्वजण सुखरूप शेंडीच्या डोंगरावर चढले. सर्वांनी वर चढल्यावर आंनद व्यक्त केला. तसेच मनसोक्त फोटो काढले. परतीच्या मार्गावर असताना यातील 8 मुली 7 तरुण खाली उतरले. मात्र पाठीमागे थांबलेले दोघे ट्रेकर बोल्डिंगमधून रोप काढत असताना अपघात झाला. वरचे बोल्डिंग दगड ठिसूळ असल्याने ते सटकले. यातच ट्रेकर असलेले मयूर दत्तात्रय म्हस्के, अनिल शिवाजी वाघ हे दोघे डोंगरावरून खाली पडले. यांच्यासोबत असलेला प्रशांत पवार हा तरुण देखील जखमी झाला.

लोकांनी डोंगरावरुन खाली पडताना पहिले

दोघे तरुण खाली पडत असताना डोंगरावर जाणाऱ्या काही व्यक्तींनी ते दृश्य पहिले. लोकांनी तात्काळ फोन करत रापली, कातरवाडी येथील तरुणांना बोलावून घेतले. अपघात झाल्याचे लक्षात येताच सदर गावातील आणि मनमाड शहरातील तरुण घटनास्थळी दाखल झासे. त्यांनी त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करत एका मृताला मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले. तर दुसरा व्यक्तीला रेस्क्यू करण्यात वेळ लागल्याने अंधार पडला. त्यानंतर रात्रीच्या अंधारात मृत तरुणाला शोधण्यात यश आले आणि तेथून रुग्णवाहिकेतून मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.

जखमी तरुणावर उपचार सुरु 

दरम्यान, या घटनेमुळे नाशिककर तसेच संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असून जखमी प्रशांत पवार याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. यातील 12 तरुण-तरुणींच्या जेवण आणि राहण्याची व्यवस्था रापली येथील माजी सरपंच संघरत्न संसारे यांच्या ग्रुपने केली.

इतर बातम्या :

अमरावतीत तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याचे प्रकरण, टेक्निशियनला दहा वर्षांचा सश्रम कारावास

एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिवस, विलिनीकरणाचा अहवाल कोर्टात सादर केला जाण्याची शक्यता

Satara Accident | साताऱ्यात भीषण अपघात, कारची दुभाजकाला धडक, 6 जखमी; दोघांची प्रकृती चिंताजनक

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.