Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी नाशिक दौरा अचानक रद्द का केला? शाहांऐवजी केंद्रीय गृहराज्यमंत्री लावणार हजेरी
केंद्र सरकारने अग्नीपथ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत 4 वर्ष तरुणांना सैन्यात नोकरीची संधी मिळणार आहे. मात्र या योजनेला देशभरातून तीव्र विरोध होताना दिसत आहे. सर्वत्र या योजनेविरोधात वातारवण असून आंदोलनं करण्यात येत आहेत. काही ठिकाणी रेल्वेही जाळण्यात आल्या. मात्र एवढा विरोध होत असतानाही केंद्र सरकार ही योजना मागे घ्यायला तयार नाही.
नाशिक : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा नाशिक दौरा रद्द (Cancelled) झाला आहे. अमित शहा यांच्याऐवजी केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय (Nityanand Roy) नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्या दोन दिवसीय कार्यक्रमांचं नियोजन पूर्ण झालेलं असताना दौरा अचानक रद्द झाला आहे. अग्निपथ योजनेवरून देशात वातावरण तापल्याने दौरा रद्द झाल्याची सूत्रांकडून माहिती कळते. अमित शाह हे राष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने 21 जून रोजी नाशिक दौऱ्यावर येणार होते. मात्र अग्निपथ योजनेवरुन वाढता रोष पाहता हा दौरा रद्द केल्याची माहिती मिळते.
केंद्र सरकारने अग्नीपथ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत 4 वर्ष तरुणांना सैन्यात नोकरीची संधी मिळणार आहे. मात्र या योजनेला देशभरातून तीव्र विरोध होताना दिसत आहे. सर्वत्र या योजनेविरोधात वातारवण असून आंदोलनं करण्यात येत आहेत. काही ठिकाणी रेल्वेही जाळण्यात आल्या. मात्र एवढा विरोध होत असतानाही केंद्र सरकार ही योजना मागे घ्यायला तयार नाही. त्यामुळे या योजनेवरुन देशात दिवसेंदिवस चिघळत चाललेले वातावरण पाहता अमित शाहांचा दौरा रद्द झाल्याची माहिती आहे.
इंदापूरमध्ये आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा रास्ता रोको
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजने विरोधात इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.शुभम निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील इंदापूर बारामती रोडवर बेलवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
अग्निपथ योजने विरोधात डोंबिवलीतही राष्ट्रवादी रस्त्यावर
केंद्र सरकारने सुरू केलेल्या अग्निपथ योजनेमुळे देशात संतापाचे वातावरण पसरले आहे. या योजनेविरोधात देशात अनेक ठिकाणी आंदोलने निदर्शने सुरू आहे. तसेच या योजनेचा निषेध करण्यासाठी आता राष्ट्रवादी देखील रस्त्यावर उतरली आहे. आज राष्ट्रवादीचे कल्याण -डोंबिवली युवक जिल्हाध्यक्ष राज जोशी यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवलीत अग्निपथ योजना आणि केंद्र सरकारच्या विरोधात एकत्र येत निदर्शने करण्यात आली. (Union Home Minister Amit Shahs visit to Nashik canceled)