Nashik Rain : गोदावरी नदीखाली बुडाली मंदिरं, पुढचे दोन दिवस बरसत राहणार मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

मंगळवार (12 जुलै)पर्यंत काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्र तसे गुजरातच्या अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.

Nashik Rain : गोदावरी नदीखाली बुडाली मंदिरं, पुढचे दोन दिवस बरसत राहणार मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा अंदाज
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 3:23 PM

नाशिक : नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार (Nashik Rain) पावसामुळे विविध मंदिरे गोदावरी नदीखाली बुडाली आहेत. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 6 ते 7 जुलैपासून पुढचे काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) विविध जिल्ह्यांत सध्या मुसळधार नंतर संततधार सुरू आहे. या पावसाचा परिणाम आता पुराच्या स्वरुपात दिसून येत आहे. समोर आलेल्या व्हिडिओंमधून या पावसाचे रौद्र रूपही दिसत आहे. दोन दिवसांपासूनच्या संततधारेमुळे नार नदीला पूर (Flood) आला असून रात्री सुरगाणा-पेठ महामार्गावरील उंबरदे पळसन पूल पाण्याखाली गेला आहे. पंचेचाळीस वर्षापूर्वीचा दगडी पूल आता धोकादायक बनला आहे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन पुलावरून प्रवास करावा लागत आहे.

नद्या-नाल्यांना पूर

सुरगण्याच्या सात ते आठ नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. पावसामुळे भात लावणीची कामे रखडली आहेत. पाऊस कमी झाल्यावर भात लागणीला वेग येणार आहे. जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील आदिवासी पट्ट्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून त्यामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. देवळा तालुक्यातील सावकी-विठेवाडी गावादरम्यान असणारा गिरणापूल पाण्याखाली गेला असून या दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे.

गंगापूर धरण भरल्याचा व्हिडिओ –

हवामान विभागाने दिला रेड अलर्ट

मंगळवार (12 जुलै)पर्यंत काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्र तसे गुजरातच्या अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. याविषयी हवामान विभागाने खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  1. – ज्या भागात पाणी साचण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते अशा ठिकाणी जाणे टाळा.
  2. – असुरक्षित ठिकाणी राहणे टाळा.
  3. – प्रवासापूर्वी तुमच्या मार्गावर वाहतूक कोंडी आहे का, ते तपासा.

सोमेश्वर धरणक्षेत्रातील पाऊस

‘गिरणापुलाचा वापर टाळा’

चणकापूर आणि पुनंद धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाले वाहू लागले आहे. चणकापूर धरणातून आज सकाळी सहा वाजता 268 क्युसेक पाण्याचा विसर्ग गिरणा नदी पात्रात सोडण्यात आला. त्यामुळे गिरणानदीला पूर आला. प्रशासनाने गिरणानदी काठावरील गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. देवळा-तालुक्यातील सावकी-विठेवाडी गावादरम्यान असणाऱ्या गिरणापुलावरून पाणी वाहत असल्याने पुलाचा नागरिकांनी वापर करू नये, असे आवाहन देवळा तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....