विद्रोही साहित्य संमेलानाचे ग्रेटा थनबर्ग यांना निमंत्रण, ग्रेटा महाराष्ट्रात येणार का?
विशेष म्हणजे या संमेलनाचे निमंत्रण दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg) यांना देण्यात आलं आहे. (vidrohi sahitya sammelan Greta Thunberg)
नाशिक : राज्यात एकीककडे 26 मार्च रोजी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केलं जात असताना दुसरीकडे विद्रोही साहित्य संमेलनसुद्धा (Vidrohi Sahitya Sammelan) आयोजन केले जात आहे. विशेष म्हणजे या संमेलनाचे निमंत्रण दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg) यांना देण्यात आलं आहे. थनबर्ग यांना निमंत्रण दिल्यामुळे या साहित्य संमेलनाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. (Vidrohi Sahitya Sammelan 2020 given invitation to Greta Thunberg)
ग्रेटा थनबर्गला आमंत्रण का?
कृषी कायद्यांना मागे घेण्याच्या मागणीवरुन देशात दिल्लीच्या वेशीवर मोठे आंदोलन सुरु आहे. सध्या हे आंदोलन चांगलेच व्यापक झाले आहे. या आंदोलनाची दखल विदेशातही घेतली जातेय. ग्रेटा थनबर्ग यांनीसुद्धा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यांनतर आता ग्रेटा यांना नाशिक येथे आोयोजित केले जाणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. याविषयी सांगताना, “या विद्रोही साहित्य संमेलनात संविधानाच्या सन्मानार्थ विचारविनियम होणार आहे. दिल्लीमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाला तसेच शेतकऱ्यांना साथ देणाऱ्या विचारवंतांना या संमेलनाचे आमंत्रण दिले जाणार आहे. ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे त्यांनाही या संमेलनाचे निमंत्रण दिले आहे,” असे विद्रोही साहित्य संमेलनाचे सदस्य राजू देसले यांनी सांगितले.
विद्रोही संमेलनामुळे मराठी साहित्य संमेलनाला अडथळा नाही
यावेळी बोलताना राजू देसले यांनी सांगितले की, “आम्ही संविधानाची मूल्ये माणणारे आहोत. मराठी साहित्य संमेलनाला सरकारने 50 लाख रुपये दिले आहेत. आमच्यामुळे त्यांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. एक मूठ धान्य आणि 1 रुपया जमा करुन आम्ही साहित्य संमेलन आयोजित करतोय. त्यामुळे मराठी साहित्य संमेलनास अडचण निर्माण नाही.
ग्रेटा थनबर्ग यांच्याविरोधात गुन्हा
दरम्यान, पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला जाहीरपणे बाठिंबा दिल्यानंतर देशात खळबळ उडाली होती. ग्रेटा यांच्या भूमिकेचे काहींनी समर्थन केले होते. तर काहींनी ग्रेटा यांना जाहीरपणे विरोध करत देशांतर्गत प्रश्नांमध्ये नाक न खुपसण्याचा सल्ला दिला होता. भारतरत्न तसेच क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यानेसुद्धा “भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं आणि ती गोष्ट त्यांनीच ठरवावी. देश हा एकसंध राहिला पाहिजे,” असं ट्विट करत ग्रेटाला अप्रत्यक्षपणे सुनावलं होतं. तसेच, शेतकरी आंदोलनाबाबत ग्लोबल सेलिब्रिटिजचे ट्वीट म्हणजे भारताविरोधातील एक विचारपूर्वक रचण्यात आलेला कट असल्याचं दिसून आलं होतं. त्याचे काही पुरावेही मिळाले होते. या पार्श्वभूमीवर भारताविरोधात प्रचार केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी ग्रेटा थनबर्गविरोधात 4 फेब्रुवारी रोजी FIR दाखल केली होती.
संबंधित बातम्या :
Greta Thunberg | दिल्ली पोलिसांकडून ग्रेटा थनबर्ग विरोधात FIR, भारताविरोधात प्रचार केल्याचा आरोप
(vidrohi sahitya sammelan 2020 given invitation to Greta Thunberg)