Igatpuri | तलाव, धरण पूर्ण भरलेले असताना इगतपुरी शहरात पाणी कपात, नागरिकांनी केला नगरपरिषदेवर मोठा आरोप…

विशेष म्हणजे तलाव, सांडवा आणि डॅम तिन्ही ओव्हर फ्लो असताना सुद्धा इगतपुरी नगरपरिषदेच्या नियोजन शून्य कारभारामुळे आठवड्यातून तीन दिवस पाणी पुरवठा शहराला होत आहे. त्यामध्येही पाणी पुरवठा हा कमी दाबाने होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोयं.

Igatpuri | तलाव, धरण पूर्ण भरलेले असताना इगतपुरी शहरात पाणी कपात, नागरिकांनी केला नगरपरिषदेवर मोठा आरोप...
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 11:11 AM

इगतपुरी : राज्यामध्ये यंदा जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावलीयं. यामुळे राज्यातील जवळपास सर्वच धरणे ओव्हर फ्लो झाल्याचे चित्र बघायला मिळतंय. इतकेच नाही तर अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नद्यांना पूर (Flood) देखील आलायं. दरवेळीपेक्षा यंदा पाऊस चांगला झाला असून पुढील काही दिवस राज्यात पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज वर्तवला जातोयं. मात्र, नाशिकच्या इगतपुरीमध्ये चांगला पाऊस होऊनही पाणी कपातीचा सामना नागरिकांना करावा लागतोयं. शहराला पाणी पुरवठा करणारे धरण ओव्हर फ्लो (Over flow) झालेले असताना शहरात पाणी कपात केली जात असल्याने नागरिकांनी आर्श्चय व्यक्त केलंय.

सरासरीपेक्षा 1350 मिमी पाऊस जास्त पडूनही शहरात पाणी कपात सुरू

पावसाचे माहेरघर, धरणांचा तालुका असलेल्या मुंबई आणि नगर जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या इगतपुरी तालुक्यात ऐन पावसाळ्यात शहरवासियांना पाणी कपातीचा सामना करावा लागतोयं. मागील वर्षापेक्षा सरासरीपेक्षा 1350 मिमी पाऊस जास्त पडूनही शहरात पाणी कपात सुरूयं. नगरपरिषद तलाव, नवीन बांधलेला सांडवा, तळेगाव डॅम पूर्ण क्षमतेने भरलेला असताना देखील शहरात पाणी कपात सुरूयं.

हे सुद्धा वाचा

पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त

विशेष म्हणजे तलाव, सांडवा आणि डॅम तिन्ही ओव्हर फ्लो असताना सुद्धा इगतपुरी नगरपरिषदेच्या नियोजन शून्य कारभारामुळे आठवड्यातून तीन दिवस पाणी पुरवठा शहराला होत आहे. त्यामध्येही पाणी पुरवठा हा कमी दाबाने होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोयं. फक्त एक तास पाणी पुरवठा सुरू असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होताना दिसत आहेत. पाऊस चांगला झाला असूनही पाणी कपात सुरू असल्याने नगरपरिषदेच्या कारभारावर नागरिकांना नाराजी व्यक्त केलीयं.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.