आमच्या आता कितीही चौकश्या लावा, आम्ही तुम्हाला तुरुंगात टाकणारच; उद्धव ठाकरे यांचा निर्वाणीचा इशारा

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांनी आताच्या परिस्थितीवर राज्य सरकार आणि केंद्र सरकारला धारेवर धरले. आमच्या आता कितीही चौकश्या लावा, आम्ही तुम्हाला तुरुंगात टाकणारच असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे गटाने त्यांचा रोख काय असेल हे जणू स्पष्ट केले.

आमच्या आता कितीही चौकश्या लावा, आम्ही तुम्हाला तुरुंगात टाकणारच; उद्धव ठाकरे यांचा निर्वाणीचा इशारा
Follow us
| Updated on: Jan 23, 2024 | 1:48 PM

नाशिक | 23 January 2024 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील मेळाव्यात राज्य आणि केंद्र सरकारव निशाणा साधला. तर निर्वाणीचा इशारा सुद्धा दिला. माझ्या शिवसैनिकांवर खोटे आरोप दाखल करण्यात येत आहेत. राजन साळवी असो वा आमचे शिलेदार झुकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. आमचे लोक तुम्हाला भ्रष्टाचारी वाटत आहेत. तुमचे भ्रष्टाचाराचे पाढे वाचत आहोत, त्याच्या चौकश्या लावा ना. आम्ही लावणार आणि तुम्हाला तुरुंगात टाकणारच आहोत, असा निर्वाणीचा इशारा ठाकरे यांनी दिला. निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटाने त्यांचा रोख स्पष्ट केला आहे.

पीएम केअरचा घोटाळा काढा

यावेळी उद्धव ठाकरे यांनी घोटाळ्याची जंत्रीच वाचली. त्यांनी पीएम केअर फंडावर बोलण्याचा आवाहन सत्ताधाऱ्यांना दिले. “मुंबई महापालिकेचा घोटाळा काढताय. पालिकेत कोरोना काळात घोटाळा झाला. काढा. ठाणे पालिकेचा काढा. पुणे काढा, नागपूर नाशिक पालिकेचाही काढा. एवढंच काय पीएम केअर फंडाचाही घोटाळा काढा. काय पीएम केअर म्हणजे काय प्रभाकर केअर फंड नव्हता तो. अरे वसाड्या फंड दे. म्हणे पीएम केअर फंड खासगी आहे. उद्या पंतप्रधान नसणार. तेव्हा तो फंड कुठे नेणार. लाखो करोड जमा केले. ते कुठे घेऊन जाणार. यांचा भ्रष्टाचार चालल्यावर एखाद दिवस बातमी चालते. वरून फोन आला की बंद होते. यांचे जे घोटाळे आहेत. नालायकांनो, रुग्णवाहिकांनो त्यातही घोटाळा केला. “, अशी घणाघाती वार त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

कॅगचा अहवालात काय म्हटले..

किशोरी ताईंवर बॉडीबॅगचा घोटाळ्याचा आरोप करता. कॅगचा अहवाल आहे, त्यात भाजपच्या राज्यात मृतदेहांवर उपचार केल्याचं दाखवून पैसे काढत आहे. त्या घोटाळ्यावर बोलत नाही. पण इकडे शिवसैनिकांना बदनाम करता. घोटाळ्याची सुरुवात पीएम केअर फंडापासून झाली. स्वच्छ असाल तर हिशोब द्याल. स्वच्छच नाही तर हिशोब कसला द्याल, असा चिमटा त्यांनी काढला.

ईडीबिडी तर घरगडी

हे ईडीबिडी त्यांच्या घरगड्यांसारखे राहतात. काही घरगडी आम्हाला द्या. आम्हीही धाडी टाकतो. कर्नाटकात काँग्रेसची सरकार आली. जेव्हा भाजपची सत्ता होती. तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी आव्हान दिलं याद राखा मला नोटीस पाठवली तर चाळीस हजार कोटींचे घोटाळे बाहेर काढेल. देशाची चौकशी करा. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कोरोनाची चौकशी करा. त्यांचे भ्रष्टाचार काढा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी दिले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.