Chhagan Bhujbal : काय पाऊस, काय पूर, काय खड्डे, समद ओके हाय, छगन भुजबळ यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा

| Updated on: Jul 16, 2022 | 7:26 PM

गुजरातमध्ये गेले गुजरात पुरात बुडाला. गुवाहाटीमध्ये गेले गुवाहाटी पुरात बुडाला. मुंबईत आले तर मुंबई ही पुरात बुडाली, अशी टीका भुजबळ यांनी शिंदे गटातील आमदारांवर केली.

Chhagan Bhujbal : काय पाऊस, काय पूर, काय खड्डे, समद ओके हाय, छगन भुजबळ यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा
छगन भुजबळ यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा
Follow us on

नाशिक : छगन भुजबळ यांनी लासलगावचा दौरा केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. भुजबळ म्हणाले, काय पाऊस, काय पूर, काय खड्डे समद ओके आहे. अधिकारी आणि पोलिसांना (officials and police) सोबत न घेता ठाणे ते भिवंडी (Thane to Bhiwandi) प्रवास करून दाखवा, असं म्हणत छगन भुजबळांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं. जागोजागी खड्डे आहेत. खड्ड्यांमुळे प्रवासाला किती तास लागतात हे समजेल. जागोजागी खड्डे असल्यामुळं अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यात खड्डेच खड्डे आहेत. गाड्या बंद पडता. वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. गाड्यांचे टायर फुटतात. वाहतूक कोंडी (Traffic jam) होते, याची जाणीव भुजबळ यांनी शिंदे यांना करून दिली.

शिंदे गटातील आमदारांवर टीका

छगन भुजबळ पूरपरिस्थितीवर म्हणाले, जिल्हा नियोजनचा निधी एकट्या येवला-लासलगाव मतदारसंघासाठी मंजूर केला नव्हता. संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील आमदारांच्या मतदार संघासाठी मंजूर केलेली कामे होती. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघातही कामे द्या अश्या जिल्हाधिकारी यांना सूचना केल्या होत्या. आमदार सुहास कांदे यांचे नाव न घेता जिल्हा नियोजनाच्या निधीबाबत भुजबळांनी खुलासा केला. गुजरात गुवाहाटीला गेलेल्या आमदारांचे कौतुक करावे, असे म्हणत भुजबळांचा शिंदे गटातील आमदारांना खोचक टोला लगावला. गुजरातमध्ये गेले गुजरात पुरात बुडाला. गुवाहाटीमध्ये गेले गुवाहाटी पुरात बुडाला. मुंबईत आले तर मुंबई ही पुरात बुडाली, अशी टीका भुजबळ यांनी शिंदे गटातील आमदारांवर केली.

मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा

छगन भुजबळ सरपंच निवडबाबत म्हणाले, सरपंच जनतेतून निवडला जाईल. सरपंचदेखील त्यांच्या सदस्यातून निवडून द्या, अशी मागणी केली. मुख्यमंत्री फुटलेल्या आमदारातून निवडला गेला. सरपंच निवडीसाठी एक न्याय आणि मुखमंत्री निवडीसाठी दुसरा, हे काय चाललंय, असंही ते म्हणाले. हे सरकार अजूनही मंत्रिमंडळ बनवत नाही, अशी टीकाही भुजबळ यांनी केली. मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा करणार, असा सवाल एकनाथ शिंदे यांना केला.

हे सुद्धा वाचा