अजितदादांनी एका एका वाक्यांनी उडवली शिंदेंची खिल्ली; म्हणाले बेरोजगारी, महागाईवरही बोला….

राज्यात बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाई प्रचंड वाढली आहे, तरीह मुख्यमंत्री एक शब्दही दसरा मेळाव्यात उच्चारत नाहीत, त्यावरुनच त्यांची लोकांविषयीची किती जाण आहे ते कळतं.

अजितदादांनी एका एका वाक्यांनी उडवली शिंदेंची खिल्ली; म्हणाले बेरोजगारी, महागाईवरही बोला....
Follow us
| Updated on: Oct 07, 2022 | 8:00 PM

भूषण पाटील, Tv9 मराठी, प्रतिनिधी, कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसची (Nationalist Congress Party) आजची कोल्हापूरातील आसुर्ले-पोर्ले येथील सभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या फटकेबाजीने गाजली. शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत असताना या दोघांचेच असलेले हे सरकार दोन महिने कसे चालवले असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना महागाई आणि बेरोजगारीवर बोलत अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. काल झालेल्या दसऱ्ंया मेळाव्याच्या भाषणावर अजित पवार यांनी टिप्पणी करत आपणहून आलेली लोकं, आपणहून आलेली लोकं हे तुम्ही अनेकदा का सांगत होता. आणि ती लोकं आपणहून आली होती, तर सभा अर्धवट सोडून उठून का गेली असा सवालही त्यांनी यावेळी केला.

खोके ओके, खोके ओके म्हणत शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवत त्यांनी शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यासाठी आणि शिवाजी पार्कसाठी तुम्ही न्यायालयात जाता.

तुमचे विचार तुम्ही ऐकावं, त्यांचे विचार ते ऐकवतील म्हणत न्यायालयाच्या प्रकरणावरुनही त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

यावेळी अजितदादा म्हणाले की, लोकशाहीध्ये आम्ही दुसऱ्याचे ऐकूनच घेणारच नाही ही भूमिका चुकीचे असल्याचे सांगत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली तिचे पालन प्रत्यकाने केले पाहिजे असंही त्यांनी सांगितले.

दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदे गटांनी जी गर्दी केली होती. आणि जी लोकं आणण्यासाठी 10 कोटी एसटीला भरले गेले त्यावरुनही अजित पवार यांनी जोरदार टीका केली.

फक्त लोकांना आणण्यासाठी तुम्ही एसटीला 10 कोटी भरता हे पैसे येतात कुठून असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

वेदांता प्रकरणावरुनही शिंदे गटावर अजित पवारांनी जोरदार हल्लाबोल केला. ज्या पुणे जिल्ह्यात कोणताही मोठा प्रकल्प आणण्यासाठी ज्या प्रकारच्या सोयी सुविधा आहेत.

त्या प्रकल्पाचा फायदा येथील युवकांना झाला असता. त्यातून दोन लाख रोजगार उपलब्ध झाला असता मात्र हा प्रकल्प बाहेर गेला.

त्यावर तुम्ही कोणतेही मत अथवा बेरोजगारीबद्दल काही बोलला नाहीत. त्या समस्या तुम्हाला महत्वाच्ंया वाटत नाहीत का असा सवालही शिंदेंना विचारला.

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.