राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची पुढील रणनीती काय? शिर्डीत होणारं शिबिर कशासाठी, अजित पवार म्हणाले…

पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून शिर्डी येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंथन वेध भविष्याचा असे राष्ट्रवादी कॉँग्रेसने शिबिराला नाव दिले आहे. नोव्हेंबरमधील 4 आणि 5 या तारखेला अभ्यास शिबिर आयोजित केले आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुण्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली […]

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची पुढील रणनीती काय? शिर्डीत होणारं शिबिर कशासाठी, अजित पवार म्हणाले...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 4:51 PM

पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून शिर्डी येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंथन वेध भविष्याचा असे राष्ट्रवादी कॉँग्रेसने शिबिराला नाव दिले आहे. नोव्हेंबरमधील 4 आणि 5 या तारखेला अभ्यास शिबिर आयोजित केले आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुण्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत त्यांना भविष्याचे आकलन व्हावं यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे अजित पवार यांनी म्हंटले आहे. या शिबिराला 1750 पदाधिकारी आणि कार्यकर्ते बोलावण्यात आले आहे. राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, 2019 मध्ये विधानसभेला आणि राज्यसभेला उमेदवार होते त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय राज्यातील आमदार, खासदार, निवड केलेले प्रवक्ते, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या अभ्यास शिबिराच्या दरम्यान प्रभावी नेते भाषण करणार असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली आहे.

शिर्डी येथील ठाकूर कॉम्प्लेक्स या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शरद पवार यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे.

याशिवाय, मधुकर भावे. जागतिक परिस्थिती आणि अर्थव्यवस्था जे एफ पाटील, सामाजिक न्याय धनंजय मुंडे, बहूजन हिताय एकनाथ खडसे,

ओबीसी आरक्षण छगन भुजबळ, डीजीटल मिडीया संजय आवटे अशा विविध विषयांवर विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे शिबिर पार पडले नव्हते, त्यात दोन वर्षांपासून तर कोरोनामुळे निर्बंध होते त्यामुळे असे कुठलेही कार्यक्रम पार पडले नव्हते.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रेसने अभ्यास शिबिर होणार असल्याचे जाहीर करत शिर्डी हे ठिकाण निवडले असून या शिबिरात पदाधिकारी, कार्यकर्त्यांना काय धडे दिले जातात हे बघणं महत्वाचे असणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.