राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या बड्या नेत्याला खड्ड्यामुळे कोणता त्रास सुरू झाला, स्वतःच सांगितलं
खड्ड्यांमुळे एकीकडे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असतांना दुसरीकडे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जेष्ठ नेत्याला देखील त्रास सुरू झाला आहे.
नाशिक : राज्यातील रस्त्यांची गेल्या काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. महामार्गावर देखील भले मोठे खड्डे पडल्याचे चित्र आहे. याशिवाय मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणच्या रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे खड्ड्यांमुळे एकीकडे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असतांना दुसरीकडे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जेष्ठ नेत्याला देखील त्रास सुरू झाला आहे. स्वतः त्यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली असून खड्डे बुजवले नाही तर टोल नाक्यावर आंदोलन करेल आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर देखील आंदोलन केले जाईल अशी भूमिका घेतली आहे. या नेत्याचे नाव आहे छगन भुजबळ ज्यांनी याबाबत स्वतः माहिती देत आक्रमक भूमिका घेतली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मला स्पॉंडिलिसिस चा त्रास सुरू झाला अशीही माहिती भुजबळ यांनी दिली आहे.
माजी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मला स्पॉंडिलिसिस चा त्रास सुरू झाला आहे, खड्डे दुरुस्त करा अशी विनंती देखील केली आहे.
पावसाळा सुरू झाल्यावर अंडरपासचे काम सुरू झालं आहे, खड्डे दुरुस्त न झाल्यास आंदोलनाला सुरुवात करावी लागेल असं ही भुजबळ म्हणाले आहे.
मागील आठवड्यात छगन भुजबळ यांनी नाशिक – मुंबई महामार्गावर रस्त्याची पाहणी करत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते.
त्यानंतर खड्डे न बुजविल्यास आंदोलनाचा इशारा देत टोल बंद पाडू असेही माजी मंत्री छगन भुजबळ यांनी इशारा दिला होता.
खड्डे बुजविले नाहीतर आंदोलन टोल बंदीचे आहेच पण अधिकाऱ्यांच्या ऑफिसवर पण असेल असे म्हणत आमची सगळी तयारी झाली आहे असेही भुजबळांनी सांगून टाकले आहे.
कोणी काय करायचे हे ठरलं आहे, त्यामुळे खड्डे बुजविले नाही तर 1 तारखे पासून आंदोलनाचे पाऊल उचलावे लागेल, गडकरीकडे सुद्धा आम्ही ही तक्रार करू अशी माहिती भुजबळ यांनी दिली आहे.