दोन दिवस दिल्लीत तळ ठोकूनही अजित पवारांची पदरी निराशाच; ‘ती’ महत्वपूर्ण भेट नाहीच
Ajit Pawar Sunil Tatkare Went to Mumbai : दोन दिवस दिल्लीत तळ ठोकूनही अजित पवारांची पदरी निराशाच आली आहे. अजित पवार अमित शाह यांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले होते. पण 'ती' महत्वपूर्ण भेट झालेलीच नाही. त्यामुळे अजित पवार आता मुंबईसाठी रवाना झाले आहेत. वाचा सविस्तर...
महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेच्या हालचाली वाढल्या आहेत. असं असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार तब्बल दोन दिवस राजधानी दिल्लीत होते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी अजित पवार दिल्लीत होते. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांना भेटण्यासाठी अजित पवार दिल्ली गेले होते. दोन दिवस दिल्लीत मुक्काम केल्यानंतरही अजित पवार आणि अमित शाह यांची भेट होऊ शकलेली नाही. त्यामुळे अखेर अजित पवारांना परत मुंबईकडे फिरावं लागलं आहे. दोन दिवस तळ ठोकून दिल्लीत थांबूनही अजित पवारांना अमित शाह यांच्या सोबतच्या भेटीसाठीचा वेळ मिळालेला नाही.
अजित पवार मुंबईकडे रवाना
दोन दिवस थांबूनही अजित पवार आणि अमित शहा यांची भेट नाही. आज सकाळी अजित पवार पुन्हा मुंबईला रवाना झाले आहेत. सोमवारी रात्रीपासून अजित पवार यांचा दिल्लीत तळ होता. जादा मंत्रिपदांसाठी आणि इतर चर्चा करण्यासाठी अजित पवार अमित शाह यांना भेटणार होते. शपथविधी तोंडावर असतानाच शाह यांची भेट न घेता अजित पवार मुंबईला रवाना झाले आहेत.
अजित पवार दिल्लीत का होते?
अजित पवार हे अमित शाह यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत गेले होते. अधिकची मंत्रिपदं आपल्या पदरी पाडून घेण्यासाठी आणि अपेक्षित खाती आपल्याकडे घेण्यासाठी अजित पवारांना अमित शाह यांना भेटणार होते. त्यासाठी ते दोन दिवस दिल्लीत होते. पण अमित शाह यांची भेट झाली नाही. शिवाय आज दुपारी महायुतीचे तीन पक्ष सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनावर जाणार आहेत. त्याआधी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तीन नेत्यांची ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक होणार आहे. त्यासाठी अजित पवार दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झाले आहेत.
आज सत्तास्थापनेचा दावा, उद्या शपथविधी
महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपची आज गटनेता निवडीची प्रक्रिया पार पडत आहे. तर आज दुपारी महायुतीच्या तिन्ही पक्षाचे नेते सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनावर जाणार आहेत. तर उद्या संध्याकाळी महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे.