राष्ट्रवादी पक्ष कुणाचा?; निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी, शरद पवारांसह ‘हे’ दोन नेते उपस्थित राहणार

Hearing Today in Supreme Court about NCP : राष्ट्रवादी पक्षाबाबत आज महत्वाची सुनावणी होत आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. या सुनावणीला स्वत: शरद पवार देखील उपस्थित असतील. या सुनावणीदरम्यान नेमकं काय होतं, हे पाहणं महत्वाचं असेल.

राष्ट्रवादी पक्ष कुणाचा?; निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी, शरद पवारांसह 'हे' दोन नेते उपस्थित राहणार
Sharad Pawar
Follow us
| Updated on: Nov 09, 2023 | 12:41 PM

 संदीप राजगोळकर, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली | 09 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी पक्षासाठी आज महत्वाचा दिवस आहे. राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा याबाबत आज सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगात आज ही सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज दुपारी चार वाजता सुनावणी होणार आहे. ही सुनावणी राष्ट्रवादी पक्षासाठी महत्वाची आहे. त्यामुळे या सुनावणीकडे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं लक्ष आहे. तसंच महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचंही या सुनावणीकडे लक्ष लागलं आहे.

सुनावणीला कोण कोण उपस्थित राहणार?

ज्या राष्ट्रवादी पक्षाची स्थापना शरद पवार यांनी आपल्या साथीदारांसोबत केली. त्या पक्षातून एक गट बाजूला झाला आणि त्यांनी आता या राष्ट्रवादी पक्षावरच दावा सांगितला आहे. अशात आता हा पक्ष नेमका कुणाचा हा प्रश्न निर्माण झालेला असताना केंद्रीय निवडणूक आयोगासमोर संध्याकाळी चार वाजता सुनावणी होणार आहे. या सुनावणीला स्वत: शरद पवार उपस्थित राहणार आहेत. तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे दोन नेते उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांच्यासोबतच राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील या सुनावणीला उपस्थित राहणार आहेत. तर अजित पवार गटाकडून कुणीही उपस्थित राहणार नाही.

अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी अजित पवार हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचा एक गट होता. या नेत्यांनी युती सरकारमध्ये जात मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर काहीच दिवसात त्यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा सांगितला. त्यानंतर आता यावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे. या सुनावणीकडे दोन्ही गटांचं लक्ष आहे.

“…तर आम्ही न्यायालयात जाऊ”

अजित पवार गटाने विधानसभा अध्यक्षांकडे 1 महिन्याची मुदत मागितली आहे. अजित पवार गटाने मुदत मागितल्यानंतर शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जोरदार टीका केली आहे. चार महिन्यांपूर्वी वल्गना करत सत्तेत बसले आणि आता आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मुदत मागत आहेत.आता महाराष्ट्राला आपोआप कळेल की खरी राष्ट्रवादी नेमकी कोणती आहे ते… त्यांनी मागितलेली मुदत ही नियमबाह्य आहे. विधानसभा अध्यक्ष कुठल्याच नियमानुसार त्यांना मुदत देऊ शकत नाहीत. कारण 31 जानेवारीपर्यंत या सगळ्या प्रकरणी अध्यक्षांना अखेरचा निर्णय घ्यायचा आहे. असा वेळ काढू पण केल्यास आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशारा प्रशांत जगताप यांनी दिला आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.