शरद पवार यांचा काल वाढदिवस होता. त्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी नवी दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार सहकुटुंब गेले होते. त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का? अशी चर्चा होऊ लागली आहे. त्यातच दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्याची गरज आहे, असं विधान आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केलं. त्यानंतर या चर्चांना बळ मिळालं. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी भाष्य केलं आहे. आम्ही शरद पवार यांना एवढ्या वेळा भेटलो. मात्र अजित पवार यांच्यासोबत जायचं या मुद्यावर आमची कधीच चर्चा झाली नाही. आमच्या विश्वासहर्यातेवार या बातम्यांमुळे देखील यामुळे प्रश्न उपस्थित केले जातात त्यामुळे बातमी देताना तपासली जावी, असं अमर काळे यांनी म्हटलं आहे.
अमित शाह काल शरद पवार यांना भेटल्याच्या बातम्या माध्यमात आल्या. यावर अमर काळे यांनी भाष्य केलं आहे. काल शरद पवार यांचा वाढदिवस होता. आम्ही तिथे 7 तास सोबत होतो त्यामुळं तिथं भेट झाली नाही हे मी दाव्याने सांगतो. भेटीच्या चर्चा मीडियामध्ये सुरू आहेत.अशी भेट झाली या बातमीत काही तथ्य नाही. आमचा कुठलाही खासदार नॉट रिचेबाल नाही हे मी दाव्याने सांगतो. अजित पवार यांच्यासोबत जाण्याची चर्चा आमची पक्षाच्या पातळीवर कुठेही कधीच झाली नाही, असं त्यांनी सांगितलं.
संजय राऊत कुठल्या आधारावर बोलतात हे माहीत नाही. ते आमच्या पक्षाकडून का बोलतात? हा चिंतनाचा विषय आहे. 5 खासदार फोडले तर मंत्रिपद हे प्रपोजल कुठेही आलं नाही. शरद पवार जो निर्णय घेतील. त्या सोबत आमचे 8 खासदार असतील, असं अमर काळे यांनी स्पष्ट केलं आहे.
संसदेच्या अधिवेशनात संविधानावर चर्चा सुरू होत आहे ही आनंदाची बाब आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आमचा महत्वाचा मुद्दा संविधान होता. त्याच मुद्यावर लोकांनी आम्हाला मतं दिली. लोकांच्या अपेक्षा आमच्याकडुन मोठ्या आहेत. संसद रोज आपल्याला बंद होताना दिसते ही खेदाची बाब आहे. आम्हा सगळ्यांना तिथे बोलायला आम्हाला संधी मिळावी ही माफक अपेक्षा आहेत, असं अमर काळे म्हणालेत.