शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी आमच्या संपर्कात, त्यांना विधानसभा…; काँग्रेस खासदाराचं विधान चर्चेत
Varsha Gaikwad On CM Eknath Shinde Group Leader : खासदार वर्षा गायकवाड यांनी दिल्लीत टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांबाबत वर्षा गायकवाड यांनी महत्वाचं विधान केलं आहे. तसंच लोकसभा निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलंय. वाचा सविस्तर...
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलंय. शिंदे गटातील अनेकजण संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यामुळे एकच चर्चा होतेय. नरेश म्हस्के यांच्याकडे माहिती कमी आहे. त्यांनी थोडी जास्त माहिती घेऊन बोलावं. एकनाथ शिंदे यांच्या सोबतचे अनेक पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत. त्यांना विधानसभेची निवडणूक लढायची आहे. गृहखात त्यांच्या सहकाऱ्याकडे असल तरी जरा माहिती त्यांची कमी पडत आहे, त्यांनी ती वाढवावी, असं काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीवर काय म्हणाल्या?
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला. वर्षा गायकवाड यांनी मतदार आणि सहकाऱ्यांचे आभार मानलेत. आज CWC बैठकीत जनतेचे आभार मानले. त्रास असताना लोकांनी मतदान केलं त्याबद्दल आभार मानले. पक्ष सोडून अनेक लोक गेले असताना आम्ही निवडणूक लढवली होती. त्याला कार्यकर्त्यांनी साथ दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानले, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते पद घ्यावं, ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे. जिथं जिथं संघर्ष होता तिथे राहुल गांधी होते. त्यांनी विचारलेले प्रश्न कसे योग्य होते हे जनतेला दिसलं. जी लढाई भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून लढले ती लढाई त्यांनी संसदेत लढावी. ते येत्या काळात राहुल गांधी त्यावर विचार करतील असा आम्हाला विश्वास आहे, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.
नवनिर्वाचित खासदार
काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या मतदारसंघात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम हे भाजपचे उमेदवार होते. या दोघांमध्ये ही लढत झाली. यात वर्षा गायकवाड विजयी झाल्या. 3, 51, 756 मतं वर्षा गायकवाड यांना मिळाली. त्यांनी उज्ज्वल निकम यांचा पराभव केला. त्यानंतर आता त्या दिल्लीत आहेत. यावेळी टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.