भर पावसातही नवी मुंबईत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, स्वच्छतेवर भर देण्याचा संकल्प

स्वातंत्र्य दिनानिमित्ताने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी शहरातील नागरिकांना आवाहन केले की, कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी नागरिकांनी काळजी घेऊन काम करावं आणि शासनाने दिलेल्या नियमावलीचं पालन करावं.

भर पावसातही नवी मुंबईत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, स्वच्छतेवर भर देण्याचा संकल्प
नवी मुंबई महापालिका ध्वजारोहण सोहळा
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 5:01 PM

नवी मुंबई : भर पावसात नवी मुंबई परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिका कार्यालये, सिडको, कोकण भवन, एपीएमसी, शाळा, सोसायट्या, महाविद्यालये अशा सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रमाचे तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी शहरातील नागरिकांना आवाहन केले की, कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी नागरिकांनी काळजी घेऊन काम करावं आणि शासनाने दिलेल्या नियमावलीचं पालन करावं. (Navi Mumbai Municipal Corporation’s resolution for cleanliness)

देशातील वास्तुरचनेचा आकर्षक नमुना असलेल्या आयकॉनिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीच्या प्रांगणात तळमजल्यावर महापालिका आयुक्त आणि प्रशासक अभिजित बांगर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. नवी मुंबई महापालिका स्वच्छतेमध्ये राज्यात नेहमीच अव्वल राहिली आहे. यापुढील काळात अधिक चांगले काम करून देशातही नंबर वन होण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी केलं. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत स्वच्छता शपथेच्या अनुषंगाने स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध आहे. ज्याप्रमाणे आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची मानसिकता व जागरूकता वाढविण्यासाठी यापुढील काळात अधिक भर दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महापालिकेला स्वच्छतेत देशात पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करुया, असं आवाहनही बांगर यांनी केलं आहे.

कोकण भवन, एमपीएमसी मार्केटमध्ये ध्वजारोहण

तिकडे कोकण भवनात कोकण आयुक्त विलास पाटील यांनी ध्वजारोहण केलं. कोकणात आलेल्या पुराला नागरिकांनी भरपूर मदद केली. यावेळी पाटील यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. नवी मुंबई एपीएमसी प्रशासकिय इमारतीच्या प्रांगणात मुंबई एपीएमसी सभापती अशोक डक यांनी ध्वजारोहण केलं. याप्रसंगी बाजार समितीच्या सचिव संदीप देशमुख, मुंबई एपीएमसी कांदा बटाटा मार्केटचे सदस्य अशोक वाळुंज आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मुंबई एपीएमसी सभापती अशोक डक यांनी सर्व बाजार घटकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिला. शेतकरी आणि व्यपार कसा टिकायला पाहीजे, अधिकारी आणि कर्मचारी काम करायला पाहीजे आणि बाजार आवारात सर्व घटकांना परस्पर मिळून काम करायला पाहीजे असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या :

काही लोक म्हणत असतील 75 वर्षात काहीच घडलं नाही, पण…; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचा भाजपवर निशाणा

Video : स्वातंत्र्यदिनी मंत्रालयाच्या गेटवर अंगावर रॉकेल ओतून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

Navi Mumbai Municipal Corporation’s resolution for cleanliness

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.