छेडछाडीची तक्रार दिल्याचा राग, नवी मुंबईत कुटुंबावर कोयता हल्ला, बहीण-भाऊ गंभीर

तरुणीने पोलिसात छेडछाडीची तक्रार केली, याचा राग मनात धरुन कुटुंबाने तिघांवर कोयत्याने वार केल्याचा आरोप आहे (Navi Mumbai Family attacked)

छेडछाडीची तक्रार दिल्याचा राग, नवी मुंबईत कुटुंबावर कोयता हल्ला, बहीण-भाऊ गंभीर
नवी मुंबई तिघा भावंडांवर कोयत्याने हल्ला
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 3:21 PM

नवी मुंबई : नवी मुंबईत दोन कुटुंबांमध्ये सुरु असलेल्या वादाचे रुपांतर खुनी हल्ल्यात झाले. कोपरी गावात तिघा जणांवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. यामध्ये बहीण-भाऊ गंभीर जखमी झाले असून दुसऱ्या भावाची प्रकृती स्थिर आहे. छेड काढल्याची तक्रार पोलिसात केल्यावरुन दोन कुटुंबांमध्ये वाद सुरु झाला. त्यातूनच हा कोयता हल्ला झाल्याची माहिती आहे. (Navi Mumbai Family attacked as Girl complains in Police about molestation)

तिघा भावंडांवर कोयत्याने हल्ला

छेड काढल्याचा आरोप करत काजल नावाच्या तरुणीने पोलिसात तक्रार केली होती. याच गोष्टीचा राग मनात धरुन आरोपी कुटुंबाने कोयत्याने हल्ला केल्याचा दावा केला जात आहे. रितिक आणि अमित हे भाऊ, तर त्यांची बहीण काजल हिच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. एकाच कुटुंबातील तिघांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने नवी मुंबईत एकच खळबळ उडाली.

बहीण-भावाची प्रकृती गंभीर

दरम्यान, जखमी भावंडांना वाशी महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी भाऊ अमित आणि बहीण काजल या दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरा भाऊ रितिक याची प्रकृती स्थिर आहे.

पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा दावा

तक्रार करून देखील एपीएमसी पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा दावा जखमी भावंडांच्या कुटुंबीयांनी केला आहे. वाशी महापालिका रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी हल्लेखोर आरोपी श्रीनिवास अय्यरला ताब्यात घेतले आहे. तर इतर चार जण घटनास्थळावरुन पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा तपस करत आहेत.

दिल्लीत पत्रकाराची हत्या

गेल्या वर्षी भाचीशी छेडछाड केल्याची पोलिसात तक्रार केल्याने दिल्लीत पत्रकार विक्रम जोशी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. जोशींना त्यांच्या मुलींच्या डोळ्यादेखत गोळी घालण्यात आली होती. आपल्या भाचीशी छेडछाड केल्याची तक्रार विक्रम जोशी यांनी पोलिसांकडे दिली होती. याचा सूड घेण्यासाठीच गुंडांनी हल्ला केला होता.

संबंधित बातम्या :

मुंबईत हॉटेलमध्ये क्वारंटाईन असलेल्या महिलेचा विनयभंग; वैद्यकीय कर्मचाऱ्याला अटक

मॉलबाहेर पोलिसाचा दाम्पत्यावर गोळीबार, व्हायरल व्हिडीओमागील सत्य काय?

(Navi Mumbai Family attacked as Girl complains in Police about molestation)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.