झिका विषाणूच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेकडून उपाययोजना सुरु, घरोघरी जाऊन व्यापक सर्वेक्षण होणार

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागानं विशेष बैठक घेत झिकासह मलेरिया, डेंग्यू आणि पावसाळी कालावधीत होणाऱ्या किटकजन्य आणि साथरोगांच्या स्थितीचा सविस्तर आढावा घेतला.

झिका विषाणूच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेकडून उपाययोजना सुरु, घरोघरी जाऊन व्यापक सर्वेक्षण होणार
झिका विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेची बैठक
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 5:09 PM

नवी मुंबई : पुणे जिल्ह्यात पुरंदरमध्ये झिका विषाणूची लागण झालेला राज्यातील पहिला रूग्ण आढळला आहे. त्या पार्श्वभूमीवर पूर्व खबरदारी घेण्याच्या दृष्टीनं महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागानं विशेष बैठक घेत झिकासह मलेरिया, डेंग्यू आणि पावसाळी कालावधीत होणाऱ्या किटकजन्य आणि साथरोगांच्या स्थितीचा सविस्तर आढावा घेतला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला ओतुरकर आणि वेबसंवादाव्दारे सर्व नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी सहभागी होते. (Navi Mumbai Municipal Corporation started measures against the background of Zika virus)

झिका विषाणू हा एडिस डासांमार्फत पसरतो व त्याची लक्षणे साधारणत: डेंग्यू आजाराप्रमाणे असतात. ताप, अंगावर पुरळ उठणे, अंगदुखी, सांधेदुखी ही झिका आजाराची सर्वसाधारण लक्षणे असून गरोदर महिलांना हा आजार झाल्यास होणाऱ्या बाळाच्या डोक्याचा घेर कमी असण्यासारखे दोष उद्भवू शकतात. त्यामुळे याविषयी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. या अनुषंगाने आयुक्तांनी झिका, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरासीस आजार होऊच नये याकरिता अधिक काळजीपूर्वक आणि प्रभावीरित्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून घरोघरी केले जाणारे ताप सर्वेक्षण तसेच डासाचे उत्पत्ती स्थाने याबाबतची सर्वेक्षण कार्यवाही अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचे आयुक्तांनी सूचित केलं.

मलेरिया, डेंग्युचे रुग्ण आढळल्यास फवारणी

एखाद्या ठिकाणी डास झाले आहेत अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर अथवा मलेरिया वा संशयित डेंग्युचे रूग्ण आढळल्यानंतर तेथे डासनाशक फवारणी केली जाते. मात्र याविषयी अधिक दक्षता घेत नागरी आरोग्य केंद्राच्या पथकांनी स्वत:हूनच अशा संभाव्य स्थानांवर नियमितपणे डासअळीनाशक फवारणी करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. रूग्ण आढळल्यानंतर कार्यवाही करावीच, मात्र आजार होऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देण्यात यावा असे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.

पथकांना लक्ष्य आखून देण्याचे आयुक्तांचे निर्देश

एखादा रूग्ण आढळल्यानंतर प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जाते, त्यासोबतच डास उत्पत्ती होऊ शकेल अशा संभाव्य जागांचा शोध सर्वेक्षणाची व्यापकता वाढवून पथकांमार्फत घेतला जावा यादृष्टीने पथकांना लक्ष्य आखून देण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी सर्व वैद्यकीय अधिकारी यांना दिले व दर आठवड्याला केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आपल्याकडे सादर करण्याचे निर्देश दिले. 50 टक्के सर्वेक्षण हे प्रतिसादात्मक व 50 टक्के सर्वेक्षण हे प्रतिबंधात्मक असायला हवे असे स्पष्ट करीत आयुक्तांनी जनतेमध्ये याविषयी व्यापक स्वरूपात माहिती पोहचवावी जेणेकरून त्यांना काळजी घेता येईल असे सूचित केले.

नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?

पावसाळी कालावधीत उद्भवणारे जलजन्य आजार, साथरोग, मलेरिया, डेंग्यू तसेच नव्याने आढळलेला झिका असे आजार टाळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सतर्क असून नागरिकांनी घरांमध्ये तसेच घराभोवती पाणी साचून त्यामध्ये डास उत्पत्ती होणार नाही याकडे लक्ष द्यावे. घरामधील फुलदाण्या, कुंड्यांखालचे व फ्रिज डिफ्रॉस्ट ट्रे, एसी डक्ट, फेंगशुई यामध्ये साचलेले पाणी नियमित बदलावे, भंगार साहित्य व टायर्स योग्य प्रकारे नष्ट करावेत, पाणी साठविण्याची भांडी व टाक्या झाकून ठेवाव्यात तसेच आठवड्यातून एकदा स्वच्छ करून पूर्ण कोरड्या कराव्यात अशाप्रकारे काळजी घ्यावयाची आहे. त्याचप्रमाणे मलेरिया, डेंग्यू अथवा इतर साथरोगांची लक्षणे आढळल्यास जवळच्या महापालिका रुग्णालयात जाऊन त्वरित मोफत उपचार करून घ्यावयाचा आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने डास उत्पत्ती स्थाने शोध मोहीम प्रभावीरित्या राबविण्यात येत असून नागरिकांनीही डास उत्पत्ती होऊ नये याकरिता काळजी घ्यावी तसेच डास उत्पत्ती स्थानांचा शोध घेण्यासाठी अथवा रुग्ण संशोधन कार्यवाहीसाठी व फवारणीसाठी घर, सोसायटी व परिसरात येणा-या महापालिका कर्मचा-यांना सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

इतर बातम्या :

नवी मुंबईत गेल्या वर्षीपेक्षा यंदा डेंग्यू सदृश्य रुग्णांमध्ये दुपटीने वाढ

नवी मुंबईत 90 केंद्रांवर लसीकरण होणार, 5 दिवसानंतर 5 हजार कोविशिल्ड, 5 हजार कोवॅक्सिन लस प्राप्त

Navi Mumbai Municipal Corporation started measures against the background of Zika virus

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.