राज्यात रोज सायबर क्राईमचे एक हजार गुन्हे, नियंत्रणासाठी उपाययोजना काय?

कोरोना काळापासून सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश नागरिकांनी ऑनलाईन खरेदीला प्राधान्य दिले. त्यामुळे इंटरनेट सायबर गुन्हेगार सक्रिय झाले.

राज्यात रोज सायबर क्राईमचे एक हजार गुन्हे, नियंत्रणासाठी उपाययोजना काय?
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 7:27 PM

पनवेल : फेसबूकवरून फसवणूक झाली. ऑनलाईन गेम खेळत असताना पैसे गेले. पीन कोड मागितले आणि बँक अकाउंटमधून रक्कम गहाळ झाली. अशा तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सायबर क्राईम नियंत्रणासाठी जाळे प्रत्येक जिल्ह्यात विणण्यात आले. पण, तक्रारींचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. या तक्रारींचे निवारण करणे सायबर क्राईमपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या आव्हानासाठी सामना करण्यासाठी सायबर क्राईम विविध उपक्रम राबवत आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या गृह आणि शिक्षण विभागाच्या वतीने कवच 2023 या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात अनेक कॉलेजमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. वेगवेगळ्या सायबर गुन्ह्यांची उकल आणि शेवट योग्य प्रकारे व्हावा, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सायबर गुन्हे सोडवण्याची स्पर्धा

पिल्लई कॉलेजने यासाठी पुढाकार घेतला. केंद्र सरकारच्या गृह विभागाच्या मार्गदर्शनाखाली यासाठीचे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रतीकात्मक विषयांवर सायबर गुन्हे सोडविण्याची स्पर्धा आयोजित केली. यात विजेत्या टीमला एक लाख रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला.

तामिळनाडू, केरळ, गुजरातसह महाराष्ट्रातील कॉलेज विद्यार्थांनी आपल्या कौश्यल्य दाखवून अनेक गुन्ह्याची उकल केली. यावेळी विजेत्या टीमला मान्यवरांच्या हस्ते धनादेश प्रमाणपत्र आणि चषक प्रदान करण्यात आले. तर याच विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे सोडवण्यासाठी सहभाग घेतला जाईल. असे गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

१९३० या हेल्पलाईन क्रमांकावर करा तक्रारी

यावेळी महाराष्ट्र सायबर विभागाचे प्रमुख संजय शिंत्रयांनी राज्यभरात दिवसाला एक हजार गुन्हे नोंदविले जात असल्याची धक्कादायक माहिती दिली. हे गुन्हे नियंत्राणात ठेवण्यासाठी सायबर क्राईमने हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. सायबर क्राईमच्या तक्रारी १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर करता येतील. या तक्रारी थेट संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येतात. अशी माहितीही संजय शिंत्रे यांनी दिली.

फेक अॅपचा वापर

कोरोना काळापासून सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश नागरिकांनी ऑनलाईन खरेदीला प्राधान्य दिले. त्यामुळे इंटरनेट सायबर गुन्हेगार सक्रिय झाले. फेक अॅपचा वापर करून गुन्हे केले जातात.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.