Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुरस्कार सोहळ्यात चेंगराचेंगरी?, अजित पवार यांचं मोठं विधान; म्हणाले, एक्झॅट आकडा अजूनही…

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताचा तडाखा बसलेल्या रुग्णांची मध्यरात्री रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. यावेळी त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. मृतांचा आकडा अजूनही समोर आला नसल्याचा दावा त्यांनी केला.

पुरस्कार सोहळ्यात चेंगराचेंगरी?, अजित पवार यांचं मोठं विधान; म्हणाले, एक्झॅट आकडा अजूनही...
ajit pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 8:20 AM

नवी मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्यातील अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार आहे. कार्यक्रमात हलगर्जीपणा झाल्यावर काय घडू शकतं हे महाराष्ट्राला पाहायला मिळालं. एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला गालबोट लागलं. काळा डाग बसला आहे. अजूनही किती लोकं मृत्यूमुखी पडले हा आकडा समोर आलेला नाही, असं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं. कोरोनाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा आकडा लपवू नका म्हणून सांगितलं होतं. पण या घटनेतील मृतांचा एक्झॅट आकडा अजूनही आलेला नाही. आता एमजीएम पनवेल, एमजीएम वाशी, टाटा आणि डीवायएम रुग्णालयात पेशंट आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेतत, असं अजित पवार म्हणाले. तसेच या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मध्यरात्री नवीमुंबईतील रुग्णालयात जाऊन उष्माघातामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. या घटनेत 20 लोक दगावल्याचं काही लोकांचं म्हणणं होतं. चॅनलवरही तसं चालू होतं. शेकड्यात लोकं गंभीर असल्याचंही कळत होतं. कालच्या कार्यक्रमाला बहुतेक पालघर, ठाणे, रायगड, काही पुणे आणि मुंबईतील लोक आले त्यामुळे गर्दी झाली होती. लोणावळ्यातील एका महिलेला मी विचारलं तुम्ही कशा आल्या? तर तिने आम्हाला न्यायला गाडी आली होती. ती कुणी पाठवली होती हे माहीत नाही, असं सांगितल्याचं अजित पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

वेळ चुकली

मृतांपैकी काही लोकांची ओळख पटली. चार लोकांची ओळख पटलेली नाही. उष्माघातामुळे किती जखमी आहेत? किती जण उपचार घेत आहेत? किती जणांना प्राथमिक उपचार देऊन घरी सोडलं? मृत्यू किती पडले? याचा आकडा कळायला मार्ग नाही. कार्यक्रमाची वेळ चुकली. संध्याकाळची वेळ असती तर योग्य झालं असतं. संध्याकाळी उन्हाची तीव्रता कमी असते. एप्रिल आणि मे मध्ये दुपारी कार्यक्रम घेऊच नये, असं अजित पवार म्हणाले.

आयोजकांचं चुकलंच

काही रुग्णांशी बोललो. यातील बरेच लोकं 15 तारखेच्या रात्रीपासून आले. त्यांच्या अंघोळीची व्यवस्था नव्हती. शौचालयाची व्यवस्था होती. आमच्या पोटात काही नव्हतं, नुसतीच फळं खाल्ली. पाण्याची व्यवस्था होती, असं रुग्णांनी सांगितलं. ऊन प्रचंड होते. ऊन्हाची तीव्रता खूप होती. कार्यक्रम संपल्यावर गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झाली. उन्हाळा असताना दुपारी कार्यक्रम घेणे हेच आयोजकांचं चुकलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय.
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख.
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा.
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर.
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज..
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज...
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्.
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी.
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक.
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन.
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी.