Navi Mumbai news : पांडवकडा धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते, पण भलतंच घडलं !

धबधब्यावर जाण्यास मनाई केली म्हणून चोरवाटेने गेले. पण त्यांचं हे नको ते धाडस जीवावर बेतलं.

Navi Mumbai news : पांडवकडा धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते, पण भलतंच घडलं !
पांडवकडा धबधब्यात अल्पवयीन मुलगा बुडालाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 3:09 PM

नवी मुंबई / 28 ऑगस्ट 2023 : सध्या पावसाळा सुरु असल्याने धबधब्यांकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. मात्र कोणत्याही अनुचित घटना घडू नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने धबधबे बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र असे असतानाही चोरवाटेने खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर जाणे एका अल्पवयीन मुलाच्या जीवावर बेतले आहे. मित्रांसोबत धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. इतर मुलांनी दिलेल्या माहितीवरुन स्थानिक, खारघर पोलीस, अग्नीशमन दल आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अनेक तास शोधमोहिम राबवत मुलाचा मृतदेह शोधून काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

चोरवाटेने गेले होते धबधब्यावर

पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. मात्र खारघरमध्ये राहणारी सहा शाळकरी मुलं रविवारी दुपारी चोर वाटेने धबधब्यावर गेली होती. मात्र पाण्यात पोहायला उतरल्यानंतर 13 वर्षाचा एक मुलगा पाण्यात बुडाला. सुदैवाने अन्य पाच जण सुखरुप आहेत. बचावलेल्या पाच जणांनी घरी याबाबत माहिती दिल्यानंतर नागरिकांनी धबधब्याकडे धाव घेतली. खारघर पोलीस, अग्नीशमन दल, रेस्क्यू टीमला घटनेची माहिती देण्यात आली.

अनेक तास शोध घेतल्यानंतर मृतदेह हाती लागला

घटनेची माहिती मिळताच खारघर पोलीस, अग्नीशमन दल, रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत शोधमोहिम सुरु केली. रेस्क्यू टीमने अनेक तास शोध घेतल्यानंतर मुलाचा मृतदेह अखेर सापडला. मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धबधबा बंद असतानाही मुलांनी चोरवाटेने धबधब्यात प्रवेश केल्याने ही दुर्घटना घडली.

हे सुद्धा वाचा

पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.