फेसबुकवरील मैत्री पडली महाग, नवी मुंबईत विधवा महिलेला सायबर गुन्हेगारांनी घातला 13 लाखांचा गंडा

| Updated on: Aug 25, 2021 | 11:08 PM

महिलेने एकूण 13 लाख 29 हजार रुपये पाठविल्यानंतर देखील तिला कुठल्याच प्रकारचे गिफ्ट मिळाले नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे या महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने नेरुळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

फेसबुकवरील मैत्री पडली महाग, नवी मुंबईत विधवा महिलेला सायबर गुन्हेगारांनी घातला 13 लाखांचा गंडा
फेसबुकवरील मैत्री पडली महाग, नवी मुंबईत विधवा महिलेला सायबर गुन्हेगारांनी घातला 13 लाखांचा गंडा
Follow us on

नवी मुंबई : फेसबुकवरुन एका अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करणे नेरुळमध्ये राहणाऱ्या एका 50 वर्षीय विधवा महिलेला चांगलेच महागात पडले आहे. या महिलेने ज्या अनोळखी व्यक्तीसोबत फेसबुकवरुन मैत्री केली, त्या व्यक्तीने सोन्याचे दागिने, घड्याळ, शूज, रोख रक्कम गिफ्ट पाठविण्याच्या बहाण्याने या महिलेला वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये तब्बल 13 लाख 29 हजार रुपये पाठविण्यास भाग पाडून तिची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. नेरुळ पोलिसांनी या प्रकरणी सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. (Friendship on Facebook fell apart, a widow in Navi Mumbai was robbed of Rs 13 lakh by cyber criminals)

अशी झाली फसवणूक

सदर प्रकरणात फसवणूक झालेली 50 वर्षीय विधवा महिला नेरुळमध्ये राहण्यास असून काही महिन्यापूर्वी डॉ. मार्को नावाच्या व्यक्तीने या महिलेसोबत फेसबुकवरुन मैत्री केली होती. त्यानंतर मार्कोने या महिलेसोबत फेसबुकवरुन चॅटिंग करण्यास सुरुवात केली. काही दिवसानंतर या दोघांनी एकमेकांना आपले मोबाईल नंबर दिल्यानंतर त्यांनी व्हॉटस्अपवरुन चॅटिंगला सुरुवात केली. त्यानंतर मार्कोने फेसबुकवरुन वैयक्तिक माहिती मिळविली आणि तिला बर्थडे आधीच गिफ्ट म्हणून सोन्याचे दागिने, घड्याळ, लेदर चप्पल, शुज, बॅग आणि रोख रक्कम 37 लाख रुपये पाठविणार असल्याचे सांगितले. तसेच सदर गिफ्टचे फोटो, व्हिडीओ आणि कुरिअरची माहिती देखील त्याने व्हॉटस्अपवर पाठवून दिली.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेची पोलीसात धाव

सदर वस्तू कुरिअरमार्फत पाठवित असल्याचे आणि त्यासाठी ठराविक रक्कम द्यावी लागेल, असे मार्कोने सदर महिलेला सांगितले. त्यानंतर रिषी झा नावाच्या व्यक्तीने या महिलेला संपर्क साधून गिफ्टचे कुरिअर पाठविण्यासाठी 29 हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार सदर महिलेने 29 हजार रुपये पाठवून दिल्यानंतर रिषी झा याने गिफ्ट म्हणून पाठविलेली 37 लाख रुपयांची युएस डॉलरची रक्कम भारतीय चलनामध्ये रुपांतरीत करण्यासाठी दिड लाख रुपये पाठविण्यास सांगितले. सदर रक्कम देखील या महिलेने पाठवून दिली. त्यानंतर गिफ्टची रक्कम मोठी असल्याचे सांगून त्यासाठी 6 लाख 50 हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्यामुळे या महिलेने आपले सोन्याचे दागिने गहाण ठेवले. तसेच मुलाच्या नावाने काढलेली एफडी तोडून या भामट्यांना पैसे पाठवून दिले. त्यानंतर देखील एजंट जय शहा, रिषी झा आणि सुमित मिश्रा या सर्वांनी सदर महिलेला वेगवेगळी कारणे सांगून पैसे पाठविण्यास भाग पाडले. अशा पध्दतीने या महिलेने एकूण 13 लाख 29 हजार रुपये पाठविल्यानंतर देखील तिला कुठल्याच प्रकारचे गिफ्ट मिळाले नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे या महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने नेरुळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. (Friendship on Facebook fell apart, a widow in Navi Mumbai was robbed of Rs 13 lakh by cyber criminals)

इतर बातम्या

‘नारायण राणे डगमणारे नेते नाहीत, ते खंबीर’, रामदास आठवले राणेंच्या भेटीला, अमित शाहांना माहिती देण्याचा सल्ला

संजय राऊत संपादक पदासाठी लायक नाहीत, राणेंचा घणाघात; ‘संभल जाओ, सुधर जाओ’, राऊतांचं प्रत्युत्तर