तर आम्हीही दि.बा. पाटलांच्या नावाचा आग्रह धरू, आंदोलन होणारच; आगरी-कोळी युथ फाऊंडेशनचे संकेत

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कृती समितीने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर चर्चा केली. (navi mumbai airport)

तर आम्हीही दि.बा. पाटलांच्या नावाचा आग्रह धरू, आंदोलन होणारच; आगरी-कोळी युथ फाऊंडेशनचे संकेत
d.b.patil-balasaheb thackeray
Follow us
| Updated on: Jun 21, 2021 | 6:17 PM

नवी मुंबई: नवी मुंबईतील विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं जात असेल तर आम्हीही दि.बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह धरू, असं सांगतानाच तसं काही घडल्यास आम्ही येत्या 24 जून रोजी आंदोलन करू, असे संकेत आगरी-कोळी युथ फाऊंडेशनने दिले आहेत. (Aagri-Koli Youth Foundation will continue protest for d. b. patil name to navi mumbai airport)

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कृती समितीने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाबाबतची वस्तुस्थिती मांडली. त्यात हे विमानतळ मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचाच भाग असल्याने या विमानतळाला दुसरे कोणाचे नाव देण्याचा मुद्दा उपस्थित होत नसल्याचे राज यांनी सांगितले. तसेच नवी मुंबईतील विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव कायम राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय महाराजांच्या नावाला कोणाचा विरोध असण्याचा प्रश्नही उद्भवत नाही, असंही त्यांनी सांगितलं. राज यांच्या पत्रकार परिषदेनंतर नामकरणाच्या वादावर पडदा पडेल असे वाटत असताना दुसरीकडे स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि भूमिपूत्र मात्र दि.बा. पाटलांच्या नावासाठी आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहे.

तांत्रिक बाब लक्षात का आली नाही?

नवी मुंबईचं विमानतळ हे मुंबई विमानतळाचा विस्तार आहे, ही तांत्रिकबाब बाळासाहेबांचं नाव विमानतळाला सूचवताना सनदी अधिकाऱ्यांच्या लक्षात कशी आली नाही? हे विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचाच विस्तार असतानाही बाळासाहेबांचे नाव सूचवले जात असेल तर आमचा देखील दि. बा. पाटलांच्या नावाचा आग्रह कायम राहील. तसेच दि.बा. पाटलांच्या नावासाठी येत्या 24 तारखेला आंदोलन करण्यात येईल, असे संकेत आगरी-कोळी युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी दिले आहेत.

समित्यांची भूमिका काय?

दरम्यान, राज ठाकरे यांनी विमानतळाची वस्तुस्थिती मांडल्यानंतर नवीमुंबईसह परिसरातील विविध प्रकल्पग्रस्त समित्यांची कोणतीच प्रतिक्रया अद्याप आलेली दिसत नाही. या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार असल्याचं सरकार सांगत आहे, प्रकल्पग्रस्तांनी दि.बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. तर विमानतळाच्या जागी बुद्ध लेण्या असल्याने बुद्धांचे नाव देण्याचा आग्रहही केला जात आहे. त्यामुळे या तीन मागण्यांपैकी कोणती मागणी पूर्ण होईल हे आता सांगणे कठीण आहे. (Aagri-Koli Youth Foundation will continue protest for d. b. patil name to navi mumbai airport)

संबंधित बातम्या:

VIDEO: बाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं: राज ठाकरे

बाळासाहेबांबद्दल ‘त्यांना’ किती आदर हे समोर आलं, शिवसेनेचा राज ठाकरेंवर पलटवार

आमचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं नाही, महाभारतातील योद्धे आम्हीच, मी तर ‘संजय’; राऊतांचा भाजपवर पलटवार

(Aagri-Koli Youth Foundation will continue protest for d. b. patil name to navi mumbai airport)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.