हेटवणेतून अतिरिक्त 30 एमएलडी पाणी उपलब्ध तळोजा, द्रोणागिरीची पाणीबाणी संपली

भविष्यातील पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सिडकोतर्फे विविध लघु आणि दीर्घकालीन योजना राबविण्यात येत आहेत

हेटवणेतून अतिरिक्त 30 एमएलडी पाणी उपलब्ध तळोजा, द्रोणागिरीची पाणीबाणी संपली
Image Credit source: (Image Google)
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 9:59 AM

नवी मुंबई : हेटवणे धरणातून अतिरिक्त 30 एमएलडी पाणीसाठा (Water) उपलब्ध झाल्यामुळे खारघर, (Kharghar) उलवे, तळोजा, (Taloja) द्रोणागिरी आणि जेएनपीए बंदर परिसरातील पाणीबाणी आता संपली आहे. या अतिरिक्त पाणीसाठ्याचा उपसा करण्यासाठी धरणाजवळ असलेल्या 50 मीटर लांबीच्या खुल्या यंत्रणेऐवजी 56 मीटर लांबीच्या बंद दाब विमोचकाची आवश्यकता होते. बंद विमोचकाचे काम 15 दिवसांच्या विक्रमी कालावधीत सिडकोने पूर्ण केले. त्यामुळे नवी मुंबईला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा सुरू झाला असून पाणीटंचाईने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी

हेटवणे पाणीपुरवठा योजनेद्वारे नवी मुंबईला 150 एमएलडी पाणी उपलब्ध होते. हेटवणे योजनेतून अतिरिक्त 120 एमएलडी पाण्याचा साठा सिडकोसाठी मंजूर करण्यात आला आहे. हा अतिरिक्त 120 एमएलडी वापरता यावा याकरिता हेटवणे योजनेचे २७० एमएलडीपर्यंत क्षमता वाढवणे आवश्यक आहे. याकरिता पाच वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची टाटा कन्सल्टिंग इंजिनीयर्स लि. (टीसीई) यांची तज्ज्ञ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. टीसीईकडून हेटवणे योजनेतून अतिरिक्त 30 एमएलडी पाण्याचा तातडीने उपसा करता यावा याकरिता सध्याच्या 50 मीटर लांबीच्या खुल्या प्रणालीऐवजी 56 मीटर लांबीच्या बंद दाब विमोचकाची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार सिडकोकडून हे काम हाती घेण्यात आले होते. ते 15 दिवसांत पूर्ण करण्यात आले. त्यामुळे नवी मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.

हे सुद्धा वाचा

पाण्याची मागणी 289

पाणीपुरवठ्याचे स्रोत वाढवणार सिडको नोड्सना हेटवणे, मोरबे, पाताळगंगा, न्हावा-शेवा योजना आणि बारवी धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. सिडको अधिकार क्षेत्रातील पाण्याची मागणी 289 एमएलडी आहे, परंतु 259 एमएलडी पाणी उपलब्ध होत असून 30 एमएलडीचा तुटवडा भासत आहे. वर्तमानातील तसेच भविष्यातील पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सिडकोतर्फे विविध लघु आणि दीर्घकालीन योजना राबविण्यात येत आहेत, अशी प्रतिक्रिया सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मखर्जी यांनी व्यक्त केली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.