जस्टडायलवर जाहिरात देऊन गाड्यांचा अपहार करणारा भामटा जेरबंद; आरोपीकडून 72 लाख 90 हजाराचा मुद्देमाल हस्तगत

कंपनी मार्फत जाहिरात देऊन वेगवेगळ्या इसमांना मोठ्या भाड्याचे अमिष दाखवून नवीन गाड्या भाडेतत्वावर घेतल्या जात होत्या. तर कार भाड्याने घेवून दोन-तीन महिने भाडे देवून नंतर कार परस्पर गहाण ठेवली जात असे.

जस्टडायलवर जाहिरात देऊन गाड्यांचा अपहार करणारा भामटा जेरबंद; आरोपीकडून 72 लाख 90 हजाराचा मुद्देमाल हस्तगत
जस्टडायलवर जाहिरात देऊन गाड्यांचा अपहार करणारा भामटा जेरबंद
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 9:05 PM

नवी मुंबई : मोटार कार भाड्याने घेऊन फसवणूक करणाऱ्या आरोपीला दुबईत पळून जाण्याच्या तयारीत असताना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी संदीप रघु शेट्टी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून जवळपास 73 लाखांच्या चारचाकी जप्त केल्या आहेत. तर याबाबत पोलीस आरोपीच्या आणखी काही साथीदारांचा तपस करत असून अशाप्रकारे फसवणूक झालेल्या नागरिकांनी तक्रारींसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी पोलिसांनी अशाच प्रकारे गुन्हा करणाऱ्यांकडून अडीच कोटींच्या गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. (Arrested for embezzling vehicles by advertising on JustDial in navi mumbai)

काय आहे प्रकरण?

‘रॉयल कार सेल्फ ड्राईव्ह’ नावाची कंपनी नव्याने चालू करून गाडी मालकांची तो फसवणूक करत होता. कंपनी मार्फत जाहिरात देऊन वेगवेगळ्या इसमांना मोठ्या भाड्याचे अमिष दाखवून नवीन गाड्या भाडेतत्वावर घेतल्या जात होत्या. तर कार भाड्याने घेवून दोन-तीन महिने भाडे देवून नंतर कार परस्पर गहाण ठेवली जात असे. अशाप्रकारे हि कंपनी गाडी मालकांची फसवणूक करत होती. याबाबत वाशी पोलीस ठाणे हद्दीतील ड्राईव्ह ईजी कार कंपनीच्या 25 कार भाडयाने घेऊन त्यांना भाडे व कार परत न देता त्यांच्या गाड्यांचा अपहार केल्याचा गुन्हा वाशी पोलीस ठाणे आणि खारघर पोलीस ठाण्यात देखील गुन्हा नोंद करण्यात आला होता.

आरोपी संदीप रघु शेट्टी याने ड्राईव्ह ईजी कंपनीच्या 25 छोट्या-मोठ्या कार ठरलेल्या रकमेवर जुलै-2021 भाड्याने घेतल्या होत्या. सदर कारचे दोन महिने वेळेवर भाडे देवून ऑगस्ट-2021 पासून भाडे व कार परत देण्यास संदीप शेट्टी नकार देवू लागला. त्यामुळे संदीप शेट्टी याने ड्राईव्ह ईजी कंपनीची अपहार करून फसवणूक केल्याचे उघड झाल्याने कंपनीचे मॅनेजर इम्रान ब्रेग यांनी दिलेल्या तक्रारीवरून नवी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीने लॉकडाऊनमधील नुकसान झालेल्या लोकांचा फायदा घेऊन गाड्या भाड्याने घेत होता. परस्पर या गाड्या गहाण ठेवून त्यांच्याकडून अंदाजे 50 ते 60 लाख रूपये गोळा केले होते. आरोपी हा खारघर येथे उच्चभ्रू वस्तीत भाड्याने राहत होता व ऐशोआरामात जीवन जगण्यात खर्च करत होता.

पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, पोलीस सह. आयुक्त डॉ. जय जाधव, पोलीस उप आयुक्त सुरेश मेंगडे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ- 1 विवेक पानसरे, सहायक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन ढगे, पोलीस नाईक सुनिल चिकणे, विनोद वारींगे, अमोल पाटील, पोलीस अंमलदार गोकुळ ठाकरे, दिलीप ठाकूर, केशव डगळे, मानसी लाड यांनी ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली. (Arrested for embezzling vehicles by advertising on JustDial in navi mumbai)

इतर बातम्या

Sardar Udham Singh Teaser: विक्की कौशल स्टारर ‘सरदार उधम सिंह’ चा टीझर रिलीज, विकी कौशल दिसला जबरदस्त लूकमध्ये

एक्स-गर्लफ्रेंडचे हात-पाय बांधले, जिवंत सुटकेसमध्ये टाकलं, नंतर जंगलात फेकलं, प्रियकर इतका निर्घृणपणे का वागला?

मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.