Navi Mumbai News : बंदी असताना धबधब्यावर जायची हौस महागात पडली, डोंगरावर चढत असताना घसरले अन्…

सध्या पावसाळा सुरु असल्याने पर्यटकांचा धबधब्यांकडे ओढा वाढला आहे. मात्र प्रशासनाकडून धबधब्यांवर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र तरीही पर्यटक तेथे जाण्याचा प्रयत्न करताना दिसून येते.

Navi Mumbai News : बंदी असताना धबधब्यावर जायची हौस महागात पडली, डोंगरावर चढत असताना घसरले अन्...
धबधब्यावर जात असताना काकी-पुतण्या दरीत कोसळलेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 01, 2023 | 12:57 PM

नवी मुंबई / 1 सप्टेंबर 2023 : सध्या पावसाळा सुरु असल्याने धबधब्यांवर भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांचा धबधब्यांकडे ओढा वाढला आहे. पावसामुळे पाण्याच्या प्रवाहात होणारी वाढ, दरड कोसळणे यामुळे घडणाऱ्या दुर्घटना लक्षात घेता प्रशासनाने अवघड ठिकाणी असलेल्या धबधब्यांवर जाण्यास बंदी घातली आहे. मात्र असे असतानाही पर्यटक चोरुन आडमार्गाने बंदी असलेल्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र त्यांचं हे नको धाडस कधी कधी जीवावर बेतताना दिसतं. अशीच घटना नवी मुंबईत उघडकीस आली आहे. बंदी असतानाही मागच्या बाजूने चोरुन धबधब्यावर जात असताना काकी-पुतण्याचा मृत्यू झाला. पारस कामी असे मयत काकीचे नाव आहे. तर 7 वर्षीय पुतण्याचाही मृत्यू झाला आहे. पनवेलमधील आदई धबधब्याजव याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

धबधब्याच्या मागच्या डोंगरावरुन जात असताना दरीत कोसळले

पनवेलमधील सुखापूर येथील रहिवासी असलेले कामी कुटुंबातील सात जण पनवेलमधील आदई धबधब्यावर पिकनिकचा आनंद लुटण्यासाठी गेले होते. धबधब्यावर जाण्यास बंदी असल्याने सर्व धबधब्याच्या मागच्या बाजूच्या डोंगरावर चढून चालले होते. मात्र पावसामुळे वाट निसरडी झाली होती. यामुळे चढताना 35 वर्षीय महिलेसह तिचा 7 वर्षाचा मुलगा घसरले आणि दरीत कोसळले.

खांदेश्वर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

दरीत काकी-पुतण्या गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बंदी असताना चोर मार्गाने धबधब्यावर जाण्याचा प्रयत्न चांगलाच अंगलट आला आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.