Ganesh Naik : भाजप आमदार गणेश नाईकांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
नवी मुंबईतल्या दोन वेगवेगल्या पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला. या दोन्ही गुन्ह्यासंदर्भात अटकपूर्व जामीन मिळावा, अशी मागणी नाईक यांनी अर्जाद्वारे केली होती.
ठाणे : भाजप आमदार गणेश नाईक (BJP Mla Ganesh Naik) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ठाणे न्यायालयानं (Thane District Court) गणेश नाईकांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यताय. बलात्कार आणि महिलेला धमकावल्याप्रकरणी भाजप आमदार गणेश नाईक यांनी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी (Bail Application) अर्ज केला होता. यावर शनिवारी सुनावणी पार पडली. कोर्टानं हा जामीनअर्ज फेटाळल्यामुळे आता गणेश नाईकांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. नाईक यांना जर जामीन दिला, तर ते तक्रारदार महिलेवर दबाव टाकू शकतात, अशी भीती सरकारी वकिलांनी यावेळी व्यक्त केली होती. तसंच त्यांच्याकडे असलेल्या रिव्हॉल्वरहचा ताबा पोलिसांना मिळणे गरजेचं अशल्याचाही युक्तीवाद यावेळी करण्यात आला. सरकारी वकिलांचा युक्तिवाद रास्त मानत ठाणे जिल्हा सत्र न्यायालयानं गणेश नाईकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावलाय.
कोणत्याही क्षणी अटक
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये गेली 27 वर्ष एका महिलेसोबत राहत तिच्यावर अत्याचार केल्याचा आणि तिला धमकावल्याचा आरोप गणेश नाईक यांच्यावर करण्यात आला होता. नवी मुंबईतल्या दोन वेगवेगल्या पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला. या दोन्ही गुन्ह्यासंदर्भात अटकपूर्व जामीन मिळावा, अशी मागणी नाईक यांनी अर्जाद्वारे केली होती. बुधवारी याप्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायालयानं दोन्ही बाजू्ंचा युक्तिवाद ऐकून घेतला होता. शनिवारी याप्रकरणी निकाल देणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं होतं. अखेर याप्रकरणी कोर्टानं गणेश नाईकांना दणका देत, त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
पीडित महिलेचे गंभीर आरोप
भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या दीपा चव्हाण यांनी आपल्या जीविताला धोका असल्याचं म्हटलं होतं. नाईक यांना जामीन मिळाल्यास माझं अपहरण होऊ शकतं तसेच माझ्याकडून जबरदस्तीने काही लिहून घेतलं जाऊ शकतं, असाही आरोप पीडित महिलेनं केला होता.
कोर्टात काय झालं होतं?
सुनावणी आधी कोर्टानं दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतली होती. यावेळी गणेश नाईक यांच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळले होते. एवढे वर्षे प्रेम संबंध असताना आता असे आरोप करणे म्हणजे राजकीय दबाव आणि फायद्यासाठी केले जात असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला होता. तसेच 376 कलम हे लावले हे योग्य नाही, असा युक्तीवाद करण्यात आलेला. यावेळी दोन्ही पक्षाच्या वकिलांकडून युक्तीवाद न्यायाधीश यांनी ऐकला आणि याबाबत अंतिम निर्णयायासाठी शनिवारची (30 एप्रिलची) तारीख दिली गेली होती. त्यानुसार सुनावणी देत, गणेश नाईकांचा अटकपूर्ण जामीन फेटाळण्यात आला आहे. गणेश नाईकांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.