डॉक्टरकडे परवानाच नाही, खारघरमध्ये बोगस डॉक्टरवर सापळा रचून कारवाई, गुन्हा दाखल

खारघरमधील सेक्टर 15 येथील खारघर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या एका बोगस डॉक्टरवरती पनवेल महानगरपालिका आणि पोलिस दलाच्यावतीने संयुक्त कारवाई करण्यात आली.

डॉक्टरकडे परवानाच नाही, खारघरमध्ये बोगस डॉक्टरवर सापळा रचून कारवाई, गुन्हा दाखल
खारघर पोलिस स्टेशन
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 8:10 AM

नवी मुंबई : खारघरमधील सेक्टर पंधरा येथील खारघर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर पनवेल महानगरपालिका आणि पोलिस दलाच्यावतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. संबंधित बोगस डॉक्टरवर गुन्हा नोंद करण्यात आलाय. आरोग्य विभाग आणि पोलिस दलाच्या वतीने ही संयुक्त कारवाई करण्यात आलीय. (Bogus Doctor Arrested by navi mumbai Police Khargar Sector 15)

खारघर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात निवासी वैद्यकिय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या बोगस डॉक्टरवरती आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या परवानगीने मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील डॉ. भक्तराज भोईटे, डॉ. सुरेश पंडित, विजय महाले, स्टाफ नर्स संगीता पाटील, विकास तीरगुळ यांच्या मदतीने सापळा रचून बोगस डॉक्टरला पकडण्यात आले.

बोगस डॉक्टरवर गुन्हा नोंद

खारघर पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शत्रुघ्न माळी तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील आणि महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी संयुक्त स्टिंग ऑपरेशन करून बोगस डॉक्टरवरती कारवाई करण्यात आली. सदर डॉक्टरकडे वैद्यकिय व्यवसाय करण्याचा परवाना नसल्याचे सिध्द झाल्याने खारघर पोलिस स्थानकांमध्ये या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुढे अशा कारवाईमध्ये पोलिस विभागाच्यावतीने पनवेल महानगरपालिकेस मदत करण्याचे आश्वासन यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी दिले.

बनावट डॉक्टर आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी रुग्णालये व खासगी वैद्यकिय व्यवसायिकांना सतर्कतेचा इशारा आहे. त्यांनी आपल्या रुग्णालयातील डॉक्टरर्सचे मूळ प्रमाणपत्र तपासून घेणे आवश्यक आहे. अन्यथा त्या बनावट डॉक्टरवर कडक कारवाई केली जाईल. विनाकारण त्या रूग्णालयालाही त्रास होऊ शकतो. यापुढे महानगरपालिका कार्यक्षेत्रात असे बनावट डॉक्टर आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना वैद्यकिय आरोग्य विभागास दिल्या आहेत.

(Bogus Doctor Arrested by navi mumbai Police Khargar Sector 15)

हे ही वाचा :

मीरा-भाईंदर भाजपमधील धुसफूस चव्हाट्यावर, जिल्हाध्यक्षपदी रवी व्यास यांच्या निवडीवरुन भाजपचे 40 नगरसेवक नाराज

‘त्यांना जितकं पळायचंय तितकं पळू द्या’, ओमी कलानी यांचं थेट भाजपला आव्हान, उल्हासनगरच्या राजकीय घडामोडींना वेग

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.