Navi Mumbai Crime : कोपरखैरणे पोलिसांकडून सोनसाखळी चोरांना अटक, साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त
समद खान हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी देखील त्याने अशा प्रकारचे 11 गुन्हे केले होते. त्यात त्यास अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याने जामीनावर सुटल्यानंतर पुन्हा त्याच प्रकारचे गुन्हे करीत होता. आरोपीस एकास पोलीस कस्टडी सुनावली आहे तर दुसऱ्या आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
नवी मुंबई : शहरातील वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलिसांनी चैन स्नॅचिंग आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा तांत्रिक तपास करत दोन चोरांना अटक (Arrest) केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 4,30,000 हजाराचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला आहे. समद शमशुलहक खान (33) आणि रिषभ भागवत प्रसाद जयस्वाल (25) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कोपरखैराने पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता आरोपींनी पाच गुन्ह्याची कबुली दिली. यातील समद खान हा सराईत गुन्हेगार (Criminal) आहे. दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता एका आरोपीला पोलीस कोठडी तर एका आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपींकडून पाच गुन्ह्याची कबुली
गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. या पथकात गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी चैन स्नॅचिंग आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा तांत्रिक तपास करत, तसेच गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे या चोरांना अटक केले. त्यांच्याकडे केलेल्या तपासाच्या अनुषंगाने कोपरखैरणे पोलीस ठाणे येथील 5 गुन्हे उघडकीस आले असून सदर गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल व सोन्याचा मुदद्देमाल असा एकूण 4,30,000 रुपये किमतीचा जप्त करण्यात आला आहे. यातील आरोपीत समद खान हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी देखील त्याने अशा प्रकारचे 11 गुन्हे केले होते. त्यात त्यास अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याने जामीनावर सुटल्यानंतर पुन्हा त्याच प्रकारचे गुन्हे करीत होता. आरोपीस एकास पोलीस कस्टडी सुनावली आहे तर दुसऱ्या आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी दिली आहे. (Chain snatcher thieves arrested by Koparkhairane police in navi mumbai)