नवी मुंबई महापालिका मुख्यालयाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्या, भाजपची मागणी

नवी मुंबई महापालिका मुख्यालयाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे.

नवी मुंबई महापालिका मुख्यालयाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्या, भाजपची मागणी
Navi-Mumbai-Municipal corporation bjp
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 3:20 PM

नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतरणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. त्यातच आता नवी मुंबई महापालिका मुख्यालयाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. मंदा म्हात्रे यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे. (Chhatrapati Sambhaji Maharaj Name to Navi Mumbai Municipal Corporation headquarters  demand from BJP MLA Manda Mhatre)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह अजित पवारांना पत्र 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतरणाचा मुद्दा गाजत असतानाच आता भाजपा तर्फे नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या नामांतरणाची मागणी केली जात आहे. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. तसेच याबाबत पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडेही मागणी केली आहे.

“संभाजी महाराजांच्या नावाला कोणाचाही विरोध नाही”

छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास नवी मुंबईकरांना कळावा या दृष्टीने ही मागणी केली आहे. तसेच संभाजी महाराजांच्या नावाला कोणाचाही विरोध नाही, अशी प्रतिक्रिया आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.

manda mhatre

manda mhatre

शिवप्रेमी, शंभुप्रेमींच्या संघटनांचा नामकरणाला पाठिंबा

विशेष म्हणजे शिवप्रेमी, शंभुप्रेमींच्या संघटनांनी यांनी याबाबतचा नामकरणाला पाठिंबा दिला आहे. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय असे नाव देण्यात यावे, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे.

(Chhatrapati Sambhaji Maharaj Name to Navi Mumbai Municipal Corporation headquarters  demand from BJP MLA Manda Mhatre)

संबंधित बातम्या : 

Coronavirus | नवी मुंबईकरांना मोठा दिलासा, शहरात डेल्टा प्लस व्हेरियंटचा एकही रुग्ण नाही

नवी मुंबईत ओबीसी आरक्षण आंदोलनामुळे मनाई आदेशाचा भंग, चित्रा वाघ यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

नवी मुंबईच्या मसाला मार्केटमधील अतिधोकादायक इमारतीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष, दुर्घटनेची शक्यता

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.