Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबई महानगरपालिकेने पूरग्रस्त भागात केलेल्या मदतकार्याची चिपळूणकरांनी आभार मानत केली प्रशंसा

कोकणासह इतर भागात अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या आकस्मिक संकटात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने तत्परतेने मदतीचा हात पुढे करीत आवश्यक यंत्रसामुग्री, वाहने, जंतुनाशके, औषधे यासह महाड, चिपळूण, कोल्हापूर भागात मदतकार्य पथके व वैद्यकीय पथके रवाना केली होती. तेथील विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी या पथकांनी अहोरात्र मेहनत घेतली.

नवी मुंबई महानगरपालिकेने पूरग्रस्त भागात केलेल्या मदतकार्याची चिपळूणकरांनी आभार मानत केली प्रशंसा
Navi Mumbai Help Chiplun
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 11:43 AM

नवी मुंबई : कोकणासह इतर भागात अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या आकस्मिक संकटात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने तत्परतेने मदतीचा हात पुढे करीत आवश्यक यंत्रसामुग्री, वाहने, जंतुनाशके, औषधे यासह महाड, चिपळूण, कोल्हापूर भागात मदतकार्य पथके व वैद्यकीय पथके रवाना केली होती. तेथील विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी या पथकांनी अहोरात्र मेहनत घेतली. त्याची दखल तेथील सर्वसामान्य नागरिकांनी घेतलीच शिवाय शासकीय पातळीवरुन तसेच लोकप्रतिनिधींकडूनही या पथकांच्या कार्याची प्रशंसा करण्यात आलीये.

चिपळूणमधील स्थानिक प्रशासनामार्फत मदतकार्य पथके पाठविण्याची मागणी नवी मुंबई महानगरपालिकेचे याविषयीचे नोडल अधिकारी उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्याकडे प्राप्त झाली. त्याला महापालिका आयुक्तांची त्वरित मान्यता लाभली आणि आयुक्तांच्या निर्देशानुसार 2 आणि 3 ऑगस्ट रोजी नवी मुंबई महानगरपालिकेची 206 स्वयंसेवकांची दोन जम्बो मदतकार्य पथके प्रशासकीय अधिकारी महेंद्र सप्रे यांच्या नियंत्रणाखाली चिपळूणकडे रवाना झाली होती. त्यामध्ये सह स्वच्छता अधिकारी विजय पडघन, स्वच्छता निरीक्षक मिलींद तांडेल, महेश महाडिक,  मनिष सरकटे,  संजय शेकडे,  अरूण पाटील, भूषण सुतार, विजय चौधरी, सहा. अग्निशमन अधिकारी रोहन कोकाटे, अग्निशमन प्रणेता शैलेश जगताप, श्रीकांत सावंत यांच्यासह 206 स्वयंसेवक सहभागी होते. या पथकांसोबत 2 फायर टेंडर व 6 बसेस आणि 3 जीप आवश्यक उपकरणे, जंतुनाशके यांच्यासह पाठविण्यात आलेल्या होत्या.

पूर ओसरल्यानंतरच्या काळात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर साचलेला गाळ, चिखलाचे साम्राज्य, कचऱ्याचे ढीग आणि कोलमडलेल्या नागरी सुविधा अशा अतिशय बिकट परिस्थितीत या पथकांकडे नेमून दिलेल्या 11 प्रभागांमधील स्वच्छतेचे काम या स्वयंसेवकांनी केलेच त्यासोबत तेथील स्थानिकांना धीर देत मानसिक उभारी देण्याचे कामही केले. स्वच्छता केल्यानंतर त्याठिकाणी जंतुनाशकाची फवारणीही करण्यात आली.

या समर्पित भावनेने केलेल्या सेवाभावी कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या मदतकार्याचे कौतुक केले. नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी महेंद्र सप्रे यांचा मदतकार्य पथकांचे नियंत्रक म्हणून मंत्रीमहोदयांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

इतरांच्या अडचणीच्या काळात मानवतेच्या दृष्टीने मदतीसाठी धावून जाणारी महानगरपालिका ही नवी मुंबई महानगरपालिकेची वेगळी ओळख या पूरपरिस्थितीमधील महाड, चिपळूण, कोल्हापूर भागीतील अथक मदतकार्याने पुन्हा अधोरेखीत झालेली आहे.

संबंधित बातम्या :

पूरग्रस्तांसाठी नवी मुंबई महापालिकेचा सिंहाचा वाटा, 206 स्वयंसेवकांचं पथक चिपळूणकडे रवाना

चिपळूण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नवी मुंबई महानगरपालिका धावली, 43 जणांचे वैद्यकीय पथक रवाना

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.